बच्चूभार्इंना मरणोत्तर शिवछत्रपती पुरस्कार मिळावा : दिनकर पाटील
By Admin | Updated: June 6, 2015 01:03 IST2015-06-06T00:57:59+5:302015-06-06T01:03:53+5:30
अखेरपर्यंत त्यांची कबड्डीशी नाळ कायम होती. शासनाने बच्चूभार्इंना मरणोत्तर शिवछत्रपती पुरस्कार द्यावा, हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.

बच्चूभार्इंना मरणोत्तर शिवछत्रपती पुरस्कार मिळावा : दिनकर पाटील
सांगली : राष्ट्रीय कबड्डीपटू बच्चूभाई हलवाई यांना मरणोत्तर शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार मिळावा, असे मत माजी आमदार दिनकर पाटील यांनी व्यक्त केले. तरुण भारत व्यायाम मंडळाच्या सभागृहात हलवार्इंना आदरांजली वाहण्यासाठी सभा पार पडली.
अध्यक्षस्थानी मंडळाचे अध्यक्ष शिवाजी सगरे होते. यावेळी दिनकर पाटील म्हणाले की, बच्चू हलवाई म्हणजे कबड्डीतील वादळ होते. अखेरपर्यंत त्यांची कबड्डीशी नाळ कायम होती. शासनाने बच्चूभार्इंना मरणोत्तर शिवछत्रपती पुरस्कार द्यावा, हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.
यावेळी मंडळाचे उपाध्यक्ष महेश पाटील, लक्ष्मण काटकर, राजीव जोशी, राजन पिराळे, प्रकाश जगताप यांनीही मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी नगरसेवक संजय बजाज, बाळासाहेब काकडे, सुहास व्हटकर, प्रमोद सूर्यवंशी, सुरेश चव्हाण उपस्थित होते.