शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
2
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
3
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
4
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
5
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
6
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
7
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
8
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
9
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
10
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
11
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
12
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
13
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
14
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
15
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
16
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
17
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
18
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
19
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
20
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल

चेतन नरके, संग्राम कुपेकर राष्ट्रवादीच्या वाटेवर, गडहिंग्लज, पन्हाळ्यातील राजकारणात उलथापालथ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2022 11:33 IST

निवडणुकांच्या तोंडावरच कुपेकर व नरके यांचा प्रवेश होणार असल्याचे समजते.

कोल्हापूर : ‘गोकुळ’चे संचालक चेतन अरुण नरके व जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती, शिवसेनेचे गडहिंग्लज विभागाचे नेते संग्राम कुपेकर हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर आहेत. कुपेकर हे शिवसेनेत अस्वस्थ आहेत.जिल्हा बँकेच्या निवडणुकीपासून त्यांची ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी जवळीक वाढली आहे, तर नरके यांनी राष्ट्रवादीचे युवा नेते आमदार रोहित पवार यांची भेट घेतली असून, दोघेही लवकरच राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत.दीड-दोन महिन्यांत जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुका होत आहेत. या निवडणुकांच्या तोंडावरच कुपेकर व नरके यांचा प्रवेश होणार असल्याचे समजते.

गडहिंग्लजमध्ये कुपेकर उपयोगी..

-संग्राम कुपेकर हे राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत होते, मात्र बाबासाहेब कुपेकर यांच्या निधनानंतर पक्षात त्यांना संधी मिळत नाही, असे वाटल्यानंतर त्यांनी ‘शिवबंधन’ बांधले. त्यांनी शिवसेनेतून २०१७ ची जिल्हा परिषद निवडणूक लढवली होती, त्यानंतर २०१९ ला चंदगड विधानसभेची निवडणूक लढवली. मात्र दोन्ही निवडणुकांत त्यांना अपयश आले.- गेली पाच वर्षे ते पुनर्वसनासाठी धडपडत आहेत, मात्र पक्षाकडून त्यांना फारशी ताकद मिळाली नाही. ‘गोकुळ’, जिल्हा बँकेच्या निवडणुकीत उमेदवारीसाठी त्यांनी जोरदार ताकद लावली होती; पण उमेदवारीच मिळाली नाही.- जिल्हा बँकेच्या निवडणुकीत त्यांनी गडहिंग्लज, चंदगड व आजरा तालुक्यातील संस्थात्मक ताकद सत्तारूढ आघाडीच्या मागे उभी केली. तेव्हापासून ते मंत्री मुश्रीफ यांच्या जवळ गेले. माजी आमदार संध्यादेवी कुपेकर या सध्या सक्रिय राजकारणापासून अलिप्त असल्याने गडहिंग्लजच्या राजकारणात संग्राम यांचा उपयोग राष्ट्रवादीला हाेणार आहे.

नरकेंना मंत्री मुश्रीफांचा हिरवा कंदील- चेतन नरके यांनी आपल्या व्यवस्थापन कौशल्याच्या बळावर युथ बँकेला अडचणीतून बाहेर काढल्याने सहकारातील अभ्यासू व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. त्यांचे वडील अरुण नरके हे राजकारणापासून अलिप्त आहेत. त्यांचे बंधू संदीप नरके हे काँग्रेसमध्ये आहेत.- पन्हाळ्यात अरुण नरके यांची संस्थात्मक ताकद आहे, ही ताकद व चेतन यांनी सहकारात निर्माण केेलेल्या प्रतिमेच्या बळावर ‘गोकुळ’च्या निवडणुकीत त्यांनी मुसंडी मारली. ‘कुंभी’ कारखान्यासाठी त्यांनी कार्यक्षेत्रात मोट बांधण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.- त्यांनी भविष्यातील राजकारणाचा विचार करून राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पवार यांची भेट घेतली असून, मंत्री हसन मुश्रीफ यांनीही त्यांच्या प्रवेशाला हिरवा कंदील दाखवला आहे.

पन्हाळ्यात ताकद वाढविण्याचा प्रयत्न- जिल्हा बँकेच्या निवडणुकीपासून बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर हे पक्षापासून काहीसे बाजूला गेल्याचे दिसते.- ते राष्ट्रवादीसोबतच राहतील, असे सध्यातरी दिसते, तरीही चेतन यांना पक्षात घेऊन पन्हाळ्यातील ताकद वाढविण्याचा प्रयत्न मंत्री मुश्रीफ यांचा आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliticsराजकारणNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv Senaशिवसेना