अंताक्षरी स्पर्धेत चौधरी, आवटे विजेत्या

By Admin | Updated: August 1, 2014 00:38 IST2014-07-31T23:43:45+5:302014-08-01T00:38:06+5:30

लोकमत सखी मंचचे आयोजन :

Chaudhary in the Antakshari tournament, the winner of the winner | अंताक्षरी स्पर्धेत चौधरी, आवटे विजेत्या

अंताक्षरी स्पर्धेत चौधरी, आवटे विजेत्या

कोल्हापूर : हिंदी चित्रपटातील गीतांवर आधारित प्राथमिक फेरी, शब्दफेरी, धून फेरी अशा विविध फेऱ्या पार करीत बिंदीया ग्रुपच्या सुविधा चौधरी, मीनाक्षी आवटे यांनी अंताक्षरी स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला.
शाहू स्मारक भवनमध्ये लोकमत सखी मंचच्यावतीने सदस्यांसाठी अंताक्षरी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात लोकमतचे संस्थापक स्वर्गीय जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमा पूजनाने व दीपप्रज्वलनाने झाली. प्रमुख पाहुण्या म्हणून महालक्ष्मी होंडाच्या स्मिता मिरजे, अक्षता मिरजे, लक्ष्मी ट्रॅक्टर्स अँड आॅटोमोबाईल्सच्या संध्या कुंभारे, एव्हॉन ब्युटी प्रोडक्टसच्या ज्योती राणी, हॉटेल केट्रीच्या कविता कडेकर उपस्थित होत्या. स्पर्धेची सुरुवात हिंदी गीतांच्या प्राथमिक फेरीने झाली. गाण्याच्या शेवटच्या अक्षरावरून सखींनी पुढील गीत गावून ही फेरी पार पाडली. शब्द फेरीत दिलेले शब्द ज्या गाण्यात असतील ते गीत ओळखणे, तर धून फेरीत संगीतावरून गीत ओळखणे अपेक्षित होते. या स्पर्धेचे संगीत संयोजन प्रल्हाद विक्रम प्रस्तूत आॅर्केस्ट्रा रॉकिंग हिटस बिटस यांच्यावतीने करण्यात आले. यावेळी उपस्थित सखी सदस्यांसाठी लकी ड्रॉ ठेवण्यात आला होता. यावेळी आॅगस्ट महिन्यात वाढदिवस असलेल्या सखींना केक कापून शुभेच्छा देण्यात आल्या. वृषाली शिंदे यांनी स्पर्धेचे परीक्षण केले. प्रल्हाद पाटील यांनी बहारदार सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)

Web Title: Chaudhary in the Antakshari tournament, the winner of the winner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.