फेसबुकवरून अनोळखी सुंदरीचे चॅटिंग... बापरे, सावधान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:17 IST2021-06-17T04:17:44+5:302021-06-17T04:17:44+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : व्यक्तीला मोह मोठा असतो, मग तो पैशाचा असो अगर मादक सौंदर्याचा. अलीकडे हाच मुद्दा ...

Chatting with an unknown hostess from Facebook ... Bapare, beware! | फेसबुकवरून अनोळखी सुंदरीचे चॅटिंग... बापरे, सावधान!

फेसबुकवरून अनोळखी सुंदरीचे चॅटिंग... बापरे, सावधान!

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : व्यक्तीला मोह मोठा असतो, मग तो पैशाचा असो अगर मादक सौंदर्याचा. अलीकडे हाच मुद्दा घेऊन फेसबुकवरून चॅटिंग करताना अनेकजण ‘हनी ट्रॅप’चे बळी पडतात. फेसबुकवरून अनोळखी सुंदरीने फ्रेंडस् रिक्वेस्ट पाठवून चॅटिंग केल्यास सावधान...! आज बदनामीच्या भीतीने ‘हनी ट्रॅप’च्या जाळ्यात फसलेले कधीही तक्रारीस पुढे येत नाहीत. ऑनलाइन सेक्स्टोरेशनच्या माध्यमातून सायबर टोळ्यांकडून पैसे उकळले जात आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील अनेकजण बळी पडले.

फेसबुकच्या माध्यमातून भावना इतरांपर्यत पोहचवल्या जातात. पण सावधान...! सध्या फेसबुकच्या माध्यमातून अनेकजण ‘हनी ट्रॅप’चे बळी पडताहेत. फेसबुकवरून अनोळखी सुंदरी अगर सुंदर मुलगा नव्याने मित्र होतात. सायबर गुन्हेगार असे बनावट खाती काढून पीडिताच्या संपर्कात येतात. खातेदार व्यक्ती ही सुंदर अगर हायप्रोफाइल असल्याचे भासवतात, प्रेमाच्या गप्पा रंगतात, अश्लील बोलणे सुरू होते. व्हिडिओ कॉल करून पीडितेला जाळ्यात ओढले जाते. नग्न होण्यास सांगून अश्लील हावभाव करण्यास भाग पाडतात. याचेचे व्हिडिओ रेकॉर्डिंग केले जाते, त्यानंतर ते अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर डाऊनलोडची धमकी देऊन हॅकर्सकडून पैशाची मागणी होते. पीडित बदनामीच्या भीतीने सायबर क्राईमकडे धाव घेतो.

मैत्रीत जमले, व्हिडिओ कॉलने फसवले

आयटी क्षेत्रात नोकरी करणाऱ्या युवकाने सुंदर स्त्रीची फेसबुक फ्रेंडस रिक्वेस्ट मान्य केली, नंतर प्रेमाचे चॅटिंग सुरू, पाठोपाठ त्या सुंदरीने त्याला व्हिडिओ कॉल करून अर्धनग्न होण्यास भाग पाडले. स्त्री सांगेल तसे त्या युवकानेही केले. तेच रेकॉर्डिंग हॅकर्सने केले. त्याची व्हिडिओ क्लीप सोशल मीडियावर अपलोडची धमकी दिली, पण त्याच्या दक्ष आईला त्याच्या हालचालीवर शंका आल्याने हे उघड झाले. अखेर वेळीच सायबर क्राइमकडे धाव घेतल्यामुळे आर्थिक फटका वाचला.

‘हनी ट्रॅप’च्या जाळ्यात महिलाही..

फेसबुकवर अनोळखी व्यक्तीशी मैत्री वाढवली, त्याने प्रेमाचे नाटक करत पीडित महिलेस प्रेमाची भेटवस्तू पाठवली. भेटवस्तू घेण्यासाठी महिलेला धमकी देत विविध खात्यावर साडेपाच लाख भरण्यास प्रवृत्त केले. नंतर फसल्याचे समजल्यानंतर तिने शहरातील पोलीस ठाण्याकडे धाव घेतली. पोलिसांनी आसामच्या जावई व सासूला ताब्यात घेऊन काही पैसे वसूल केले.

शंका आल्यास संपर्क साधा...

- ऑनलाइनवरून ‘हनी ट्रॅप’ झाल्याची अगर इतर मार्गे फसवणुकीची शंका आल्यास तत्काळ पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा

- सोशल मीडियावरील अनोळखी व्यक्तीशी चॅटिंग टाळावे. व्यक्तिगत माहिती इतर सहकाऱ्यांना शेअर करू नका. व्हिडिओ कॉलवर समोरील व्यक्तीच्या सांगण्याच्या आहारी जाऊ नका. फोनमध्ये खासगी फोटो अथवा व्हिडिओ सेव्ह करून ठेवू नयेत.

कोट...

फेसबुकवर अगर सोशल मीडियावर अनोळखी मित्रांशी मैत्री अगर चॅटिंग करू नका, त्यातूनही फसवणूक झाल्यास पोलीस ठाण्याशी अगर सायबर सेलशी संपर्क साधा. - श्रीकांत कंकाळ, पोलीस निरीक्षक, सायबर सेल, कोल्हापूर

Web Title: Chatting with an unknown hostess from Facebook ... Bapare, beware!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.