शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

अंबानी-अदानी तुपाशी, शेतकरी मात्र उपाशी!; गडहिंग्लजमध्ये शेतकऱ्यांचा धडक मोर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2023 12:39 IST

'भस्मासूरा'ला शेतकऱ्यांचा लगाम!

गडहिंग्लज: अंबानी-अदानी मांडीवर, शेतकरी मात्र वाऱ्यावर, अंबानी-अदानी तुपाशी, शेतकरी मात्र उपाशी, अन्यायी- जुलमी पाणीपट्टी, जलमापक यंत्राची सक्ती मागे घ्या, अश्वशक्तीऐवजी मीटरप्रमाणेच वीज बील आकारणी करा, दुष्काळी गडहिंग्लज तालुक्यातील संपूर्ण पाणीपट्टी व वीजबीले माफ करा, अशा जोरदार घोषणा देत तालुक्यातील शेतकऱ्यांनी गडहिंग्लजमध्ये काढलेला ऐतिहासिक मोर्चा लक्षवेधी ठरला.गडहिंग्लज विभाग कृषीपंपधारक अन्याय निवारण शेतकरी संघर्ष समितीतर्फे येथील पाटबंधारे व महावितरणच्या विभागीय कार्यालयांसह प्रांतकचेरीवर हा मोर्चा काढण्यात आला. येथील गांधीनगरातील गणेश मंदिरापासून मोर्चाला सुरुवात झाली. पाटबंधारे व महावितरण कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांना जाब विचारण्यात आला. त्यानंतर प्रांतकचेरीच्या आवारात मोर्चाची सांगता झाली. यावेळी श्रमिक  मुक्ती दलाचे कार्याध्यक्ष कॉ. संपत देसाई, माजी सभापती अमर चव्हाण, जनता दलाचे तालुकाध्यक्ष बाळेश नाईक, कॉ.शिवाजी गुरव, कॉ.संजय तर्डेकर यांची भाषणे झाली.मोर्चात माजी नगराध्यक्षा स्वाती कोरी, कॉग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत देसाई,दिग्विजय कुराडे,मनसे जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले, शिवसेना तालुकाप्रमुख दिलीप माने,किसान संघाचे बाळगोंडा पाटील, राजू मोळदी, उदय पाटील, बाबासाहेब पाटील, सुजित देसाई, मल्लिकार्जुन आरबोळे, वसंत  नाईक आदींसह कार्यकर्ते, शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

पाणीपट्टी वसुली जुन्यादरानेच !चालू वर्षांतील कृषीपंपाच्या पाणीपट्टीची वसुली जुन्या दरानेच केली जाईल,असे लेखी तर अन्य स्थानिक प्रश्नांसंदर्भात अधिक्षक अभियंता यांच्या उपस्थितीत २८ नोव्हेंबरला गडहिंग्लजमध्ये बैठक घेण्यात येईल असे आश्वासन कार्यकारी अभियंता शिल्पा मगदूम यांनी दिले.यावेळी उपअभियंता अविनाश फडतरे उपस्थित होते.

कृषीपंपाची वीज तोडणार नाही!'गडहिंग्लज'चा समावेश दुष्काळी तालुक्यात झाल्याने थकीत वीज बिलांच्या वसुलीसाठी कृषीपंपाची वीज तोडली जाणार नाही.तसेच   वीज बिलात दुरुस्ती करून शासन निर्णयानुसार ३३ टक्के सवलत दिली जाईल, अशी ग्वाही 'महावितरण'चे कार्यकारी अभियंता विजयकुमार आडके यांनी दिली.

'भस्मासूरा'ला शेतकऱ्यांचा लगाम! 'मनसे'चा गडहिंग्लज शहर उपाध्यक्ष अभिजित किर्तीकर हा भस्मासूराच्या वेशभूषेत मोर्चात सहभागी झाला होता. त्याच्या गळ्यात 'पाटबंधारे- महावितरण भस्मासूर' असा फलक होता. मात्र,त्याच्या हातातील दोऱ्यांच्या लगाम शेतकऱ्यांच्या हाती होता.त्याची गडहिंग्लज  परिसरात विशेष चर्चा झाली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरFarmerशेतकरी