तांबूळवाडी, डुक्करवाडी, बागिलगे येथील ओढ्यांचे पात्रच बदलले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:25 IST2021-07-28T04:25:02+5:302021-07-28T04:25:02+5:30
भात, ऊस, नाचना आदी पिके वाहून गेली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. मुसळधार पावसाने डुबा, बारी, ...

तांबूळवाडी, डुक्करवाडी, बागिलगे येथील ओढ्यांचे पात्रच बदलले
भात, ऊस, नाचना आदी पिके वाहून गेली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. मुसळधार पावसाने डुबा, बारी, सातेरी, टेक या डोंगरदऱ्यातून येणारे पाणी गावाजवळून वाहणाऱ्या ओढ्यातून थेट ताम्रपर्णी नदीत जाते. मात्र, ताम्रपर्णी नदीलाच महापूर आल्याने या ओढ्यातील पाण्याला तुंब आला. परिणामी पाणी पुढे जात नसल्याने ओढ्याला भगदाड पडून पाण्याचे पात्रच बदलले. शिवारात उभ्या पिकात दगड, माती, झाडेझुडपे जाऊन पिकेच मातीत गाडली गेली. डुक्करवाडी, तांबूळवाडी, बागिलगे, गावाजवळून गेलेल्या ओढ्याजवळील १० एकरांतील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करून भरपाई द्यावी, अशी मागणी सरपंच राजू शिवणगेकर यांनी केली आहे.
फोटो ओळी : चंदगड तालुक्यातील अनेक ओढ्यालगत असणाऱ्या शेतीचे असे नुकसान झाले आहे.
क्रमांक : २७०७२०२१-गड-०५