शहरं
Join us  
Trending Stories
1
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
3
तमाशातील नर्तकीवर प्रेम, पण ती टाळायला लागल्याने माजी उपसरपंच झाला वेडापिसा, त्यानंतर तिच्या घरासमोरच उचललं टोकाचं पाऊल
4
वर्क फ्रॉम होम कल्चर संपतंय का? 'या' दिग्गज टेक कंपनीनंही आपल्या कर्मचाऱ्यांना ऑफिसला बोलावलं
5
रशिया-युक्रेन युद्धात 'या' देशानं मारली उडी; रशियन ड्रोन्स पाडले, F 16 लढाऊ विमाने हवेत झेपावली
6
धनत्रयोदशी-दिवाळीपर्यंत कुठवर पोहोचणार सोन्याचा दर? आता आहे ₹१.१२ लाखांच्या पार, खरेदीपूर्वी पाहाच
7
'ही' छोटी कार आता ३ लाख रुपयांपर्यंत स्वस्त; जीएसटी कपातीमुळे नवीन किंमती जाहीर
8
नेपाळमध्ये लष्कराने सूत्रं हातात घेतली, एअर इंडिया-इंडिगोची विमान उड्डाणे रद्द
9
आता टेन्शन फ्री होईल मध्यम वर्ग; या ५ सरकारी स्कीम करतील तुमची रिटायरमेंट आणि सेव्हिंग सुपर सेफ, पाहा कसं?
10
कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात
11
महाराष्ट्रात ७०० आरटीओ अधिकाऱ्यांची कमतरता, प्रशासनावर ताण
12
"त्याला उचकी आली आणि...", 'अशी ही बनवा बनवी'मधील शंतनूचं असं झालं निधन, पत्नीचा खुलासा
13
वाद-प्रतिवाद सुरू असलेल्या भारताला आज स्वीकारमंत्र अंगीकारण्याची गरज -मोरारीबापू
14
Prithvi Shaw: सपना गिल विनयभंग प्रकरणात न्यायालयाने पृथ्वी शॉला ठोठावला १०० रुपयांचा दंड!
15
Stock Markets Today: शेअर बाजार सुस्साट, निफ्टी २५,००० च्या पार; IT-रियल्टी शेअर्समध्ये जोरदार तेजी
16
सी. पी. राधाकृष्णन : संघस्वयंसेवक ते उपराष्ट्रपतिपदापर्यंतचा चढता आलेख
17
जे कोणालाच जमलं नाही ते आर्यन खानने केलं, 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून दिलं मोठं सरप्राईज
18
Asia Cup 2025: सूर्यकुमारने पाकिस्तानच्या कर्णधाराशी हात मिळवला की नाही? Video झाला व्हायरल
19
Crime: संतापजनक! चालत्या कॅबमध्ये विद्यार्थिनीसमोर हस्तमैथुन, चालकाला अटक!
20
Genz Protests Nepal: तरुणाईच्या आगीत नेपाळ स्वाहा! नेत्यांच्या भ्रष्टाचाराने जेरीस, सोशल मीडिया बंदीने ओतले तेल

Char Dham Yatra: ‘उत्तराखंड’मध्ये अडकले कोल्हापूरचे भाविक, नव्या यात्रेकरूंची नोंदणी रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2022 14:05 IST

एरवी हरिद्वारहून ऋषिकेशला जाण्यासाठी दीड तास पुरत असे. परंतु आता ५ ते ६ तास लागत आहेत.

कोल्हापूर : ‘उत्तराखंड’मधील चारधाम यात्रेसाठी भाविकांनी प्रचंड गर्दी केल्यामुळे या परिसरातील नियोजन कोलमडले आहे. अनेक हॉटेल्सचालकांनी खोल्यांचे दर मोठ्या प्रमाणावर वाढवले आहेत. रस्त्यावर भाविकच भाविक असल्याने गर्दी पुढेच सरकत नसल्याचे चित्र आहे. यावर उपाय म्हणून मे महिनाअखेरीपर्यंतची नवी नोंदणी बंद करण्यात आली आहे. कोल्हापुरातून या यात्रेसाठी गेलेल्या पर्यटकांनी ही माहिती ‘लोकमत’ला दिली. एरवी हरिद्वारहून ऋषिकेशला जाण्यासाठी दीड तास पुरत असे. परंतु आता ५ ते ६ तास लागत आहेत.

उत्तराखंडमधील बद्रीनाथ, केदारनाथ, यमनोत्री आणि गंगोत्रीला जाऊन चारधाम यात्रा करणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे. या चारधाम यात्रेसाठी उत्तराखंडच्या पर्यटन विभागाच्या वतीने ऑनलाईन तसेच हरिद्वार आणि ऋषिकेश या ठिकाणी नोंदणीही करण्यात येते. ६ मेपासून या यात्रांना सुरुवात झाली. चारधामसाठी जाण्यासाठी नोंदणी आवश्यक असल्याने नागरिक प्रतीक्षेत आहेत.

अनेक भाविक अडकलेथेट हरिद्वार किंवा ऋषिकेश येथे जाऊन नोंदणी करण्यासाठी हजारो भाविक आले आहेत. परंतु वाढत्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पर्यटन विभागाने आता चारधामसाठीची नोंदणी बंद केली आहे. २७ मेपर्यंतची नोंदणी बंद केल्याने आता तोपर्यंत या भाविकांना या दोन शहरांमध्येच मुक्काम करावा लागणार आहे किंवा परत जावे लागणार आहे.

एका खोलीसाठी १० हजार रुपयेकेदारनाथ येथे राहण्यासाठी मोठ्या सुविधा नाहीत. त्या मर्यादित आहेत आणि भाविकांची संख्या मात्र वाढली आहे. त्यामुळे एक रात्र राहण्यासाठी एका खोलीला १० हजार रुपयांचा दर सांगितला जात आहे आणि भाविक पर्याय नसल्याने तो स्वीकारत आहेत. केदारनाथ येथे दर्शनाची रांग तीन किलोमीटरपर्यंत गेल्याचे सांगण्यात आले.सन          केदारनाथ दर्शन घेणाऱ्या भाविकांची संख्या२०१९       ९ लाख २६ हजार२०२०       २ लाख २० हजार२०२१       २ लाख ४२ हजार२०२२       १ लाख ३२ हजार (७ दिवसात)

कोरोना संपल्याने मोठ्या संख्येने भाविक चारधाम यात्रेसाठी येत आहेत. परंतु नोंदणी बंद केली आहे. नोंदणी बंद करताना थेट आलेल्या भाविकांचे काय करायचे, याचा निर्णय प्रशासनाला घ्यावा लागणार आहे. - रवी सरदार, अध्यक्ष, टुर ऑपरेटर्स असोसिएशन

टॅग्स :kolhapurकोल्हापूर