चपाती जाड आहे, थोडी पातळ बनवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:31 IST2021-07-07T04:31:46+5:302021-07-07T04:31:46+5:30
कागल : शासनाच्या कामगार मंत्रालयाच्या वतीने नोंदीत बांधकाम कामगारांसाठी दोन वेळच्या मोफत माध्यान्ह भोजन योजनेचा शुभारंभ कागल शहरात मंत्री ...

चपाती जाड आहे, थोडी पातळ बनवा
कागल :
शासनाच्या कामगार मंत्रालयाच्या वतीने नोंदीत बांधकाम कामगारांसाठी दोन वेळच्या मोफत माध्यान्ह भोजन योजनेचा शुभारंभ कागल शहरात मंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आला झाला. कार्यक्रम संपताच जेवण वाढवण्याच्या ठिकाणी जाऊन श्री. मुश्रीफ यांनी प्रत्येक पदार्थाची कसून तपासणी केली. येथील बापूसाहेब महाराज चौकात हा कार्यक्रम झाला. या वेळी सेवानिवृत्त पोलीस उपअधिक्षक सतीश माने, भैय्या माने, मुख्याधिकारी पंडित पाटील, प्रकाश गाडेकर, प्रवीण काळबर आदी मान्यवर तसेच कामगार विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
या जेवणाचा दर्जा व गुणवत्ता तपासण्यासाठी आपल्याबरोबरच सहकाऱ्यांनाही व्यासपीठावरच जेवण वाढण्याच्या सूचना त्यांनी पुरवठादाराला केल्या आणि चपाती हाती घेत पुरवठादाराला चपाती जरा पातळ बनवा व चांगली भाजा, असे सांगून इतर पदार्थ उत्कृष्ट असून सर्वत्र हाच दर्जा ठेवा. काकडीबरोबरच कांदाही ठेवा. अशा बारीकसारीक सूचनाही दिल्या.
राज्याचे ग्रामविकास आणि कामगार खात्यासाखी महत्त्वाची पदे भूषविणाऱ्या व्यक्तीचा हा सामान्य कामगारांप्रति असणारा जिव्हाळा यातून स्पष्ट झाल्याने जमलेले कामगार व कार्यकर्तेही अचंबित झाले. विशेष म्हणजे मंत्री मुश्रीफ यांनी जेवण वाढण्याची सूचना केल्यावर पुरवठादार गोंधळून दुसरी ताटवाटी शोधू लागला. त्यावर मंत्र्यांनी मजुरांसाठी तयार केलेलेच ताट द्या असे सांगितले.
फोटोओळी.
कागल
- कामगार मंत्रालयाच्यावतीने बांधकाम कामगारांना दोन वेळच्या मोफत भोजन योजनेच्या शुभारंभ कार्यक्रमात मंत्री मुश्रीफ यांनी सहकाऱ्यांसह व्यासपीठावरच जेवण केले.