शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामसेवकांचा अनागोंदी कारभार; बेनिक्रे ग्रामपंचायतीला सरपंचांनीच ठोकले टाळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2022 14:22 IST

गेल्या वर्षभरापासून गटविकास अधिकारी, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे वारंवार लेखी तक्रार करूनही दखल घेतली गेली नसल्याने ही संतापाची लाट उसळली.

म्हाकवे : बेनिक्रे (ता.कागल) येथील ग्रामसेवक आण्णाप्पा कुंभार यांचा मनमानी, कामचुकार व भ्रष्ट कारभार आणि वरिष्ठ अधिकार्यांचीही याकडे कानाडोळा करत असतील तर ग्रामपंचायत कार्यालयालायाचा उपयोगच काय? या संतापातूनच चक्क सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांनीच कार्यालयाला टाळे ठोकले. गेल्या वर्षभरापासून गटविकास अधिकारी, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे वारंवार लेखी तक्रार करूनही दखल घेतली गेली नसल्याने ही संतप्त सदस्यांनी हे पाऊल उचलले.घरफाळा व पाणीपट्टी वसूल करून बँक खात्यात जमा न करता परस्पर खर्च करणे, शासनाकडून आलेला निधी तीन वर्षांपासून वाटप झालेला नाही. कर्मचार्यांना मानधन व फंडाची रक्कम मिळालेली नाही. आशा स्वयंसेविकांना कोरोना काळातील अनुदानही दिलेले नाही. तसेच, सरपंच, सदस्यांना विश्वासात न घेताच ग्रामसेवक कुंभार हे कारभार करत आहेत. याबाबत वरिष्ठाकडे तक्रार करुनही दखल घेतली गेली नाही. अखेर संतापलेल्या सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांनीच आज, शुक्रवारी सकाळी ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे ठोकले.यावेळी सरपंच अश्विनी गुरव, संदीप वाडकर, कृष्णा जाधव, शिपाई आनंदा वाडकर, दिव्यांग प्रतिनिधी निलेश हासबे, आशा स्वयंसेविका अश्मिता पालकर, माजी सरपंच काकासाहेब काळूगडे, दिनकर मगदूम, उपसरपंच सुर्याजी जाधव, सदस्य सचिन वाडकर, सतिश पालकर आदी उपस्थित होते.राजकीय वरदहस्ततब्बल वर्षभर वरिष्ठांकडे लेखी तक्रारी केल्या, दीड महिन्यापुर्वी ग्रामपंचायतीला टाळे घालण्याचा इशारा दिला. तरीही प्रशासन दुर्लक्ष केले. त्यामुळे ग्रामसेवक कुंभार यांना राजकीय वरदहस्त मिळत आहे की काय अशी शंकाही ग्रामस्थांतून व्यक्त होत आहे.

 ग्रामसेवक बदलून मिळाल्यानंतरच हे टाळे काढू. तसेच, कुंभार यांच्या बदलीबाबत ठाम असून प्रसंगी सामुहिक उपोषणालाही बसण्याचा निर्धार केला आहे. -अश्विनी गुरव,  सरपंच बेनिक्रे

टॅग्स :kolhapurकोल्हापूरkagal-acकागलgram panchayatग्राम पंचायत