महागावातील अंगणवाडीचे बदलणारं रूप लक्षवेधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:16 IST2021-07-01T04:16:53+5:302021-07-01T04:16:53+5:30

अंगणवाडी इमारतीला रंगरंगोटीसह स्वच्छतागृहांची उभारणी करण्यात आली आहे. सोलरद्वारे, एलईडी टीव्ही, पंखा, लाईट कार्यान्वित करण्यात आले आहे. सुविधायुक्त ...

The changing look of Anganwadi in Mahagaon is remarkable | महागावातील अंगणवाडीचे बदलणारं रूप लक्षवेधी

महागावातील अंगणवाडीचे बदलणारं रूप लक्षवेधी

अंगणवाडी इमारतीला रंगरंगोटीसह स्वच्छतागृहांची उभारणी करण्यात आली आहे. सोलरद्वारे, एलईडी टीव्ही, पंखा, लाईट कार्यान्वित करण्यात आले आहे. सुविधायुक्त बेंचची व्यवस्था करण्यात आली आहे. मुलांना वॉटर बॅग, हॅण्डवॉश, नॅपकिन आदी आवश्यक वस्तूंचे किटही देण्यात येणार आहेत. परसबागेची निर्मिती करण्यात येत असून येथे विविध फळा, फुलांची झाडे लावली जाणार आहेत. तसेच मुलांना खेळण्यासाठी विविध प्रकारची खेळणीही उपलब्ध केली जाणार आहेत.

अशा या स्वच्छ, सुंदर सुविधायुक्त वातावरणात या अंगणवाडीचे रूप आकर्षक ठरत आहे. अंगणवाडी शिक्षिका रश्मी राम किंकर व पूजा सचिन भोसले अंगणवाडीला निसर्गरम्य वातावरणाचा साज चढवित मुलांमध्ये शिक्षणाबद्दल सकारात्मक ऊर्जा निर्माण होण्यासाठी धडपड करताना दिसत आहेत.

फोटो ओळी : शासनाच्या स्मार्ट अंगणवाडीत समावेश झालेली महागाव (ता. गडहिंग्लज) येथील अंगणवाडीची इमारत.

क्रमांक : ३००६२०२१-गड-०२

Web Title: The changing look of Anganwadi in Mahagaon is remarkable

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.