गोकुळ मतमोजणीसाठी वाहतूक मार्गात बदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:38 IST2021-05-05T04:38:33+5:302021-05-05T04:38:33+5:30

वाहतुकीसाठी प्रवेश बंद करण्यात आलेले मार्ग : मुख्य पोस्ट ऑफिस चौक ते एस. पी. ऑफिस चौक ते चार क्रमांकाच्या ...

Changes in transport routes for Gokul counting | गोकुळ मतमोजणीसाठी वाहतूक मार्गात बदल

गोकुळ मतमोजणीसाठी वाहतूक मार्गात बदल

वाहतुकीसाठी प्रवेश बंद करण्यात आलेले मार्ग : मुख्य पोस्ट ऑफिस चौक ते एस. पी. ऑफिस चौक ते चार क्रमांकाच्या फाटकाकडे व पितळी गणपती चौक ते एस. पी. ऑफिस चौक जाण्या-येण्यास प्रवेश बंद करण्यात आला आहे. रमणमळा ते ड्रिम वर्ल्ड मागील रस्त्यानेही धोबी कट्ट्यापर्यंत ये-जा करण्यास व पवार बंगल्याकडून धान्य गोदामाकडेही ये-जा करण्यास वाहनांना प्रतिबंधित करण्यात आले आहे. शहरातून कसबा बावडा, शिरोली एमआयडीसीकडे जाणाऱ्यांना धैर्यप्रसाद हाॅलमार्गे पुढे जाता येईल.

वळविण्यात आलेला मार्ग असा : महावीर काॅलेज ते कसबा बावड्याकडे जाणारी वाहने जिल्हाधिकारी कार्यालय चौक ते धैर्यप्रसाद हाॅल - सर्किट हाऊस, लाईन बझारमार्गे पुढे मार्गस्थ होतील. त्याप्रमाणे बावड्याकडून मध्यवर्ती बसस्थानकाकडे येणारी वाहनेही भगवा चौक- लाईन बझार-सर्किट हाऊस -धैर्यप्रसाद हाॅलमार्गे जा-ये करतील. पोलीस वाहने, रुग्णवाहिका, अग्निशमन दल, शासकीय वाहने निवडणूक अधिकाऱ्यांनी दिलेल्या पासधारकांनाच या परिसरात ये-जा करता येणार आहे.

पार्किग सुविधा

मतमोजणीकरिता येणारे अधिकारी, कर्मचारी, प्रतिनिधींची वाहने पोलीस मुख्यालय उद्यानासमोरील मोकळ्या जागेत व फुटबाॅल मैदान, इस्तेर पॅटर्न स्कूलचे मैदान या तीन ठिकाणी पार्किग करण्याची सोय करण्यात आली आहे.

रमणमळा परिसरातील नागरिकांसाठी पर्यायी मार्ग : यशवंत सोसायटी, पोवार मळा येथील नागरिकांनी १०० फुटी रस्त्याचा वापर करावा. शंभर ठाण, रमणमळा, जावडेकर सोसायटी, छत्रपती शाहू विद्यालय परिसरातील नागरिकांनी पोलो मैदान, छत्रपती शाहू हायस्कूल, महावीर काॅलेज, प्राणी संग्रहालय मागील फाटक ते महावीर काॅलेज रस्त्याचा वापर करावा.

Web Title: Changes in transport routes for Gokul counting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.