शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: अंबाबाई दर्शन रांगेच्या व्यवस्थेत बदल केला, दर्शनास वेग आला; कशी आहे व्यवस्था.. जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2025 17:54 IST

व्हीआयपी गळ घालण्याचा त्रास कमी

कोल्हापूर : यंदाच्या शारदीय नवरात्रौत्सवात कोल्हापुरातील श्री अंबाबाई मंदिरातील दर्शन रांगांची व्यवस्था बदलून देवीचे दर्शन गाभाऱ्याबाहेरील चांदीच्या उंबऱ्याऐवजी पितळी उंबऱ्याबाहेरून वळवण्यात आले आहे. तर, सरस्वती मंदिर येथील गेट बॅरिकेड्स लाऊन बंद केले आहे. त्याऐवजी शनि मंदिराजवळील गेट खुले करून तेथून भाविकांना बाहेर जाण्याचा मार्ग केला आहे. या पूर्ण मार्गावर लाकडी रॅम्प केले असून, या सर्व बदलांमुळे भाविकांना अंबाबाईचे दर्शन वेगाने घडत आहे, तर मंदिर परिसर भाविकांच्या गर्दीने फुलून गेले आहे.नवरात्रौत्सवात अंबाबाईच्या दर्शनासाठी देशभरातून लाखो भाविक येतात. त्यांना फार वेळ रांगांमध्ये उभे राहावे लागू नये, यासाठी यंदा प्रथमच गाभारा दर्शन रांग बाहेरील पितळी उंबऱ्यापासून वळविण्यात आली आहे. एरवी ही रांग गाभाऱ्याबाहेरील चांदीच्या उंबऱ्यापर्यंत असते. मंदिर प्रवेश करताना साक्षी गणपतीपासून ते महाकाली मंदिर, अंबाबाई गाभाऱ्यासमाेरील पितळी उंबरा ते शनि मंदिर या पूर्ण दर्शन मार्गेवर लाकडी रॅम्प लावल्याने मंदिरात खाली-वर असलेल्या दगडी फरश्यांचा भाविकांना न त्रास होता पुढे जाणे सोयीस्कर झाले. शनि मंदिराजवळील सर्व लोखंडी दरवाजे काढून टाकून येथून बाहेर पडायचा मार्ग मोकळा केला आहे. अगदी व्हीआयपी आले, तर त्यांना येथून सोडले जात होते.व्हीआयपी गळ घालण्याचा त्रास कमीअंबाबाईचे दर्शन घेतलेले भाविक सरस्वती मंदिरापासून बाहेर पडायचे. इथेच अनेक भाविक थेट व्हीआयपी दर्शनासाठी गळ घालत गर्दी करायचे. त्यामुळे मोठा गोंधळ व्हायचा. ते टाळण्यासाठी सरस्वती मंदिराजवळील गेट बॅरिकेड्स लाऊन बंद केले आहे.गरुड मंडपात पहिला अभिषेक..अंबाबाई मंदिर परिसरात नव्या दिमाखात साकारत असलेल्या गरुड मंडपात सोमवारपासून धार्मिक विधींना प्रारंभ झाला. ही वास्तू धोकादायक झाल्याने गेल्या तीन वर्षांपासून बंद होती. यंदा मात्र पुरातत्व विभागाकडून नव्याने गरुड मंडप साकारले जात असून, खास नवरात्राेत्सवासाठी वेगाने लाकडी खांब, कमानी उभारण्यात आल्या आहेत. छतासाठी पत्रे मारून खाली मांडव साकारला आहे. या नव्या गरुड मंडपात सोमवारी पहाटेपासून भाविकांकडून अंबाबाईचे अभिषेक सुरू करण्यात आले.