शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

देखाव्यांच्या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतूक मार्गांत बदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2019 11:29 IST

सार्वजनिक गणेश मंडळांनी उभारलेले देखावे, मूर्ती, सजावटी पाहण्यासाठी शहरासह ग्रामीण भागातील लोकांची गर्दी होणार आहे. या पार्श्वभूमीवर शहरात वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी काही मार्ग बंद, तर काही मार्ग खुले केले आहेत.

ठळक मुद्देदेखाव्यांच्या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतूक मार्गांत बदलवाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलिसांचे नियोजन

कोल्हापूर : सार्वजनिक गणेश मंडळांनी उभारलेले देखावे, मूर्ती, सजावटी पाहण्यासाठी शहरासह ग्रामीण भागातील लोकांची गर्दी होणार आहे. या पार्श्वभूमीवर शहरात वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी काही मार्ग बंद, तर काही मार्ग खुले केले आहेत. नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.बंद व खुले केलेले मार्ग|भवानी मंडप येथून शिवाजी चौकाकडे जाण्यासाठी सर्व वाहनांना सोळंकी कोल्ड्रिंक हाऊस या ठिकाणी प्रवेश बंद केला आहे. या वाहनांनी जेल मार्गाने बिंदू चौक या एकेरी मार्गाचा वापर करावा. बिनखांबी गणेश मंदिराकडून निवृत्ती चौकाकडे जाणाऱ्या सर्व मोटार वाहनांना बिनखांबी या ठिकाणी प्रवेश बंद करण्यात आला आहे. गांधी मैदानकडून खरी कॉर्नरला जाणाºया सर्व वाहनांना गांधी मैदान मेनगेट येथे प्रवेश बंद केला, ही वाहने महाराष्ट्र हायस्कूलमार्गे पुढे मार्गस्थ होतील.मिरजकर तिकटी व गांधी मैदानकडून खरी कॉर्नरमार्गे लाड चौकाकडे जाणाºया चारचाकी मोटार वाहनांना खरी कॉर्नर या ठिकाणी प्रवेश बंद केला आहे. ही वाहने गांधी मैदानमार्गे पुढे जातील. तटाकडील तालीम, सरस्वती टॉकीज, उभा मारूती चौक, निवृत्ती चौकाकडे येणारी वाहने बिनखांबी गणेश मंदिर किंवा गांधी मैदानमार्गे पुढे जातील. राधानगरीमार्गे येणारी वाहने बिनखांबीमार्गे पुढे जातील. कोकणातून गगनबावडामार्गे येणारी वाहने फुलेवाडी नाका ते आपटेनगर चौक, साई मंदिर कळंबा रिंगरोडवरून ताराराणी चौकातून पुढे जातील.शिये फाटा येथून कसबा बावडा मार्गे कोल्हापुरात येणारी सर्व वाहने रात्री आठपासून शिये फाटा येथून महामार्गावरून पुढे सरळ जाऊन तावडे हॉटेलमार्गे कोल्हापुरात येतील. तसेच याच शहरातून बावडामार्गे जाणारी वाहने ताराराणी चौकातून पुढे जातील. शुक्रवार पेठेत वाघाच्या तालमीकडे जाणारी वाहतूक एकेरी केली आहे. राजारामपुरी ११ वी गल्ली आग्नेय मुखी मारूती मंदिर ते जनता बाजारकडे येणाºया मेन रोडवरील वाहतूक दोन्ही बाजूने बंद केली आहे. माउली पुतळा ते कमला कॉलेजकडे जाणारी वाहतूक एकेरी केली आहे.वाहनतळबिंदू चौक मनपा पार्किंग, सिद्धार्थनगर मैदान, दसरा चौक, राजारामपुरी शाळा नंबर ९, उर्मिला चित्रपटगृह महापालिका पार्किंग, शहाजी लॉ कॉलेजचे मैदान, मेन राजाराम मैदान, प्रायव्हेट हायस्कूल मैदान, चिन्मय इलेक्ट्रॉनिक, गांधी मैदान, पेटाळा हायस्कूल येथे पार्किंगची सोय केली आहे. वाहनधारकांनी येथे गाड्या उभ्या करून देखावे पाहण्याचा आनंद घ्यावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. 

 

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीसGanpati Festivalगणेशोत्सवkolhapurकोल्हापूर