शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
4
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
5
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
6
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
8
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
9
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
10
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
11
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
12
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
13
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
14
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
15
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
16
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
18
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
19
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
20
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: चंदगड तालुक्याचे नाव बदलले, तांत्रिक घोळाने कामकाज खोळंबले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2023 19:14 IST

एनआयसीकडून मोठी चूक, तालुक्यातील एका नागरिकाने उत्पन्न दाखला काढल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला

निंगाप्पा बोकडेचंदगड : गेल्या आठवड्यात जिल्ह्यात एक अजब प्रकार घडला असून गावाचे नाव बदलण्यासाठी अर्ज केले असताना चक्क तालुक्याचे नाव बदलले गेले. एनआयसीकडून ही मोठी चूक घडल्यामुळे गेले काही दिवस तहसील कार्यालयातील कामकाज ठप्प झाले होते. सोमवारी उशिरा मात्र हे दुरुस्त झाल्याने लोकांना दिलासा मिळाला आहे. चंदगड तालुक्यातील डुक्करवाडी गावाचे नाव गेल्या महिन्यात बदलण्यात आले. त्यावेळी गावाबरोबरच एनआयसीने तालुका ही तहसील ही रामपूर केल्यामुळे मोठा गोंधळ उडाला होता. त्यामुळे आँनलाईन कामकाज ठप्प झाले होते. चंदगड तालुक्याचे नावच रामपूर केल्याने आँनलाईन दाखला काढण्यास गेल्यानंतर ही बाब ही उघडकीस आले. डुक्करवाडी गावचे नाव रामपूर करण्यासाठी एनआयसीकडे प्रस्ताव दाखल करण्यात आला होता. पण एनआयसीने केवळ रामपूर गावाऐवजी संपूर्ण तालुकाच रामपूर केल्यामुळे हा अजब प्रकार घडल्याचे समजते. तालुक्यातील एका नागरिकाने उत्पन्न दाखला काढल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर प्रशासन सर्व कामकाज थांबवत तहसीलदार राजेश चव्हाण यांनी पुढाकार घेऊन एनआयसीला ही निदर्शनास आणून दिली. त्यामुळे सोमवारी सायंकाळी ही दुरुस्ती करण्यात आली. त्यामुळे तालुक्यातील नागरिकाना दिलासा मिळाला आहे. पण शासनाच्या या अजब प्रकारामुळे अनेकांना याचा फटका बसल्याने याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरchandgad-acचंदगड