भोगावती प्रशासकीय इमारतीमधील बदललेला लुक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:21 IST2021-01-04T04:21:02+5:302021-01-04T04:21:02+5:30
भोगावती साखर कारखान्याची प्रशासकीय इमारत कारखान्याच्या स्थापनेवेळी बांधण्यात आलेली आहे.अतिशय प्रशस्त जागेत असणाऱ्या या इमारतीमध्ये पुरेसा प्रकाश आणि हवा ...

भोगावती प्रशासकीय इमारतीमधील बदललेला लुक
भोगावती साखर कारखान्याची प्रशासकीय इमारत कारखान्याच्या स्थापनेवेळी बांधण्यात आलेली आहे.अतिशय प्रशस्त जागेत असणाऱ्या या इमारतीमध्ये पुरेसा प्रकाश आणि हवा योग्य पद्धतीने खेळती राहील अशा स्वरूपात उभा करण्यात आली आहे.इमारतीमध्ये प्रवेश करत असताना असणाऱ्या हॉलमध्ये कारखान्याचे अध्यक्ष आ. पी. एन. पाटील आणि उपाध्यक्ष उदयसिंह पाटील-कौलवकर यांनी या हॉलचा चेहरा-मोहरा बदललेला आहे. अतिशय सुबक आणि सुंदर रंग काम करून प्रवेशद्वाराच्या समोर मराठी मनाचे श्रद्धास्थान आई अंबाबाई आणि तिरुपती-बालाजी यांचे फोटो लावून त्यावर विद्युत रोषणाई केलेली आहे. त्यामुळे आत प्रवेश करत असताना प्रसन्नतेची झलक येणाऱ्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर पाहावयास मिळते आहे.
भोगावती साखर कारखान्यामध्ये येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक सभासद, ऊस उत्पादक, शेतकरी आणि व्यापारी या ठिकाणी आल्यानंतर प्रत्येकाला आई अंबाबाई चे दर्शन घेण्याचा मोह आवरत नाही आणि त्याशिवाय पाय पुढे सरकत नाही, अशी परिस्थिती आहे.तसेच कारखान्यात येणारा कर्मचारीदेखील कामावर हजर होत असताना दर्शन घेऊनच स्थानापन्न होत आहे. त्यामुळे एकूणच कारखान्याच्या प्रशासकीय इमारतीमधील वातावरणदेखील प्रफुल्लित पाहावयास मिळत आहे.
चौकट :
जगद्जननी अंबाबाई आणि बालाजी ही आमची दैवत आहेत या दैवताची सदैव कृपा असते.या आपल्या कारखान्याच्या ऊस उत्पादक,सभासद,कर्मचारी,शेतकरी याच्यावर कृपा राहावी. कारखान्यावर कोणाची वाईट नजर लागू नये सदैव खुशाली राहावी अशी प्रार्थना करून आम्ही पूजन केले आहे, असे अध्यक्ष पाटील आणि उपाध्यक्ष पाटील यांनी यावेळी सांगितले.
भोगावती कारखान्याच्या प्रशासकीय इमारतीतील हॉलमध्ये स्थानापन्न केलेल्या अंबाबाई आणि बालाजी यांचे दर्शन घेत असताना अध्यक्ष पी. एन. पाटील,उपाध्यक्ष उदयसिंह पाटील, कार्यकारी संचालक के. एस. चौगले उपस्थित होते.