शुक्रवार पेठ चौकीपासूनच्या वाहतूक मार्गात बदल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 04:27 IST2020-12-06T04:27:04+5:302020-12-06T04:27:04+5:30
पोलीस अधीक्षकांचे आदेश : शहरातून ऊस वाहतुकीवर बंदी लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : शहरात सुरू असलेले अमृत नळ योजनेचे ...

शुक्रवार पेठ चौकीपासूनच्या वाहतूक मार्गात बदल
पोलीस अधीक्षकांचे आदेश : शहरातून ऊस वाहतुकीवर बंदी
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : शहरात सुरू असलेले अमृत नळ योजनेचे काम नियोजित वेळेत पूर्ण व्हावे, याकरिता ५ ते १० डिसेंबर या कालावधीत वाहतुकीच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. वाहनचालकांनी उपलब्ध करून दिलेल्या मार्गाचा वापर करावा, असे आवाहन पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी केले आहे. रात्री आठ ते सकाळी सहा या वेळेत रस्त्याची कामे होणार आहेत.
वाहतुकीस प्रवेश बंद व पर्यायी मार्ग
१) छत्रपती शिवाजी महाराज पूल ते गंगावेशकडे जाणारी सर्व प्रकारची जड, अवजड, हलकी वाहने तसेच ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर-ट्रॉलीला प्रवेश बंद करण्यात आला आहे.
२) गंगावेशकडून छत्रपती शिवाजी महाराज पुलाकडे जाणारा मार्ग ऊस वाहतुकीसाठी बंद
३) छत्रपती शिवाजी महाराज पुलाकडून, गंगावेशकडून जाणारी वाहने तोरस्कर, सोन्या मारुती, सीपीआर चौक, भाऊसिंगजी रोड, माळकर तिकटी, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते गंगावेश अशी पुढे सोडण्यात येतील.
४) गंगावेशकडून छत्रपती शिवाजी महाराज पुलाकडे जाणारी वाहने पापाची तिकटी, माळकर तिकटी, भाऊसिंगजी रोड, सीपीआर चौक या मार्गाने मार्गस्थ होतील.