शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
4
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
5
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
6
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
8
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
9
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
10
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
11
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
12
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
13
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
14
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
15
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
16
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
18
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
19
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
20
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रकांत पाटील यांच्या कारभाराचीही चौकशी व्हावी: ए. वाय. पाटील यांचे प्रत्युत्तर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2020 12:20 IST

कोल्हापूर : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे पूर्वी काय होते आणि गेल्या पाच वर्षांत सत्तेच्या काळात ते कोठे पोहोचले? ...

ठळक मुद्दे चंद्रकांत पाटील यांच्या कारभाराचीही चौकशी व्हावी: ए. वाय. पाटील यांचे प्रत्युत्तर, राष्ट्रवादी कॉँग्रेसची बैठक शाहू समाधी स्मारक स्थळ लोकार्पण सोहळा लोकोत्सव करणार : महापौर

कोल्हापूर : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे पूर्वी काय होते आणि गेल्या पाच वर्षांत सत्तेच्या काळात ते कोठे पोहोचले? एकंदरीत त्यांच्या पाच वर्षांतील कारभाराचीच चौकशी व्हावी, असे प्रत्युत्तर राष्ट्रवादी कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी मंगळवारी येथे दिले.

दरम्यान, रविवारी (दि. १९) राजर्षी शाहू समाधी स्मारक स्थळ लोकार्पण सोहळा ‘लोकोत्सव’ म्हणून साजरा केला जाणार आहे. यामध्ये कोल्हापूरच्या जनतेने सहभागी व्हावे, असे आवाहन महापौर अ‍ॅड. सूरमंजिरी लाटकर यांनी येथे केले.छत्रपती शिवाजी स्टेडियम येथील राष्ट्रवादी कॉँगे्रेसच्या शहर कार्यालयात राजर्षी शाहू समाधी स्मारक स्थळ लोकार्पण सोहळा व राष्ट्रवादी  कॉँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या दौऱ्यानिमित्त नियोजनासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते. प्रमुख उपस्थिती जिल्हा बॅँकेचे माजी संचालक व्ही. बी. पाटील, शहराध्यक्ष आर. के. पोवार, माजी उपमहापौर परीक्षित पन्हाळकर, माजी नगरसेवक राजेश लाटकर, जिल्हा सचिव मधुकर जांभळे, अनिल कदम, बाबा जगताप, अमरसिंह पाटील, नगरसेवक सचिन पाटील, आदींची होती.मंत्री मुश्रीफ यांनी लोकवर्गणीतून कारखाना काढला आहे; तर सतेज पाटील यांची संपत्ती ही वडिलोपार्जित आहे. त्यामुळे चौकशी करायचीच असेल तर ती चंद्रकांत पाटील यांच्या गेल्या पाच वर्षांतील कारभाराचीच झाली पाहिजे, असे ए. वाय. पाटील म्हणाले.

पक्षाच्या जिल्हा कार्यालयासाठी राजारामपुरी व शाहू मार्केट यार्ड येथील इमारतींची पाहणी केली आहे. त्यांपैकी एक ठिकाण निश्चित केले जाईल, असे ते म्हणाले. महापौर लाटकर, आर. के. पोवार, राजेश लाटकर यांनी मनोगत व्यक्त केले. सुनील देसाई यांनी स्वागत केले. मधुकर जांभळे यांनी आभार मानले.

 

 

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसkolhapurकोल्हापूर