शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

मोठी बातमी! देवेंद्र फडणवीस यांच्यापाठोपाठ चंद्रकांत पाटील यांनाही धक्का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2022 14:26 IST

सत्तांतरानंतर आता जिल्ह्यातून मंत्रिपदासाठी विनय कोरे, प्रकाश आबिटकर, राजेंद्र यड्रावकर यांची नावे आघाडीवर असल्याचे सांगण्यात आले.

कोल्हापूर : 

सत्तांतरानंतर आता जिल्ह्यातून मंत्रिपदासाठी विनय कोरे, प्रकाश आबिटकर, राजेंद्र यड्रावकर यांची नावे आघाडीवर असल्याचे सांगण्यात आले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लोकसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रित करावे. यासाठी संघटनेत राहावे, असाही प्रवाह असल्याचे समजते. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्रिपदाची संधी गेली व आता चंद्रकांतदादाही मंत्रिमंडळात नाहीत का असा विचार करून भाजपचे कार्यकर्तेही अस्वस्थं आहेत. भाजप नक्की काय निर्णय घेईल हे सांगता येणे कठीण असल्याचे सांगण्यात येते.

चंद्रकांत पाटील यांनी २०१४ ते २०१९ या काळात महसूल, सहकार, सार्वजनिक बांधकाम, कृषी, मदत आणि पुनर्वसन अशा विविध खात्यांचा कार्यभार सांभाळला. सध्या त्यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी आहे. येणारा काळ हा निवडणुकांचा असल्याने पाटील यांनी पूर्णवेळ संघटनेसाठी द्यावा, असा एक मतप्रवाह असल्याने भाजप कार्यकर्ते अस्वस्थ आहेत. परंतु पाटील यांच्या आतापर्यंतच्या कामाचा आवाका पाहता त्यांचा मंत्रिमंडळातील समावेश काहीजणांना पक्का वाटतों. तसे झाल्यास कोल्हापूर व पुण्याचे ते पालकमंत्रीही असतील. विनय कोरे यांचे नाव मंत्रिपदासाठी आघाडीवर आहे. गेल्या विधानसभेला त्यांनी भाजपच्या सूचनेवरून त्यांच्या जनसुराज्यकडून काही उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले होते.

देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांचे अत्यंत घनिष्ठ संबंध आहेत. त्यामुळे ते पालकमंत्रीही होऊ शकतात अशी चर्चा सुरू झाली आहे. जिल्ह्यात भाजपला बळ देताना हसन मुश्रीफ आणि सतेज. पाटील यांना अंगावर घेण्याची अट मंत्रिपद देताना स्पष्टपणे घातली. जाईल, असे सांगण्यात आले. प्रकाश आवाडे हे भाजपचे तत्कालिन विद्यमान आमदार सुरेश हाळवणकर यांना पराभूत करून निवडून आले. तातडीने त्यांनी भाजपला पाठिंबाही जाहीर केला. राष्ट्रवादीचे नेते शदर पवार आणि काँग्रेसमधील अनेक ज्येष्ठ नेत्यांशी जवळचे संबंध असूनही त्यांनी जिल्ह्याच्या राजकारणातही सर्व निवडणुकांमध्ये भाजपला पूरक भूमिका घेतली आहे. आवाडे यांच्या ताकदीचा पूर्ण क्षमतेने उपयोग करून घेण्यासाठी भाजप प्रयत्नशील आहे. त्यांना केंद्राकडून वस्त्रोद्योगासाठी भरीव मदत आणि लोकसभेसाठी राहुल आवाडे यांच्या उमेदवारीबाबत विचार केला जाणार असल्याने त्यांचा मंत्रिमंडळात समावेश होण्याची .

प्रकाश आबिटकर यांना संधीआमदार प्रकाश आबिटकर हे दुसऱ्यांदा आमदार झाले आहेत. राजेंद्र पाटील अपक्ष निवडून आले, परंतु त्यांना शिवसेनेच्या कोट्यातून मंत्रिपद दिले गेल्याने टिकट अडीच वर्षे नाराज होता. यातूनच मग ते शिंदे यांच्यासोबत गेले. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात ताकद निर्माण करण्यासाठी आबिटकर यांना मंत्रिपद मिळू शकते.

यड्रावकरांच्या जोडण्या.. राजेंद्र पाटील यड्रावकर यांना शिवसेनेकडे पाठवून शरद पवार यांच्या सांगण्यावरून त्यांना मंत्रिपद दिल्याची चर्चा त्यावेळी जोरात होती. राज्यमंत्री असतानाही त्यांनी बंड केले असल्याने त्यांचे मंत्रिपद कायम राहील असे दिसते. त्यासाठी कराव्या लागणाऱ्या उलाढाली सुरू आहेत.

राजेश क्षीरसागर विधानपरिषदेवर राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या यादीमध्ये राजेश क्षीरसागर यांचा समावेश होण्याचीही रा शक्यता वर्तवण्यात येत आहे. तोपर्यंत किमान नियोजन मंडळाचे कार्याध्यक्षपद हे कॅबिनेट पदाचा दर्जा असलेले पद कायम राहण्याचीही शक्यता आहे.

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस