शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रकांत पाटील माझ्या नादाला लागू नका, सगळ्या भानगडी बाहेर काढू; सतेज पाटलांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2022 11:36 IST

चंद्रकांत पाटील यांनी व्यक्तिगत टीका-टिप्पणी करू नये, त्यांनी पुन्हा टीका केली तर मीही यादवापासून दिवाणजीपर्यंतच्या सगळ्या भानगडी बाहेर काढू, असा इशारा मंत्री पाटील यांनी दिला.

कोल्हापूर : उत्तर प्रदेशसह इतर राज्यांतील यशाने भाजपाच्या नेत्यांना उन्माद आला असून त्यातूनच वाटेल ते बडबडत आहेत. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी माझ्या नादाला लागू नये, अन्यथा यादवापासून (चंद्रकांत पाटील हे पालकमंत्री असताना विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव) दिवाणजीपर्यंतच्या (दिवाणजी म्हणून प्रसिद्ध असलेले तलाठी प्रकाश शिंदे) सगळ्या भानगडी बाहेर काढू, असा इशारा पालकमंत्री सतेज पाटील यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिला.मंत्री सतेज पाटील म्हणाले, चंद्रकांत जाधव यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने ही पोटनिवडणूक होत आहे. वास्तविक छत्रपती ताराराणीच्या भूमीतून पहिल्या महिला आमदार म्हणून निवडून देण्याची संधी कोल्हापूरकरांना आली असताना चंद्रकांत पाटील यांच्या हट्टापायी ही निवडणूक लागली आहे.ठीक आहे, लोकशाही मार्गाने त्याला सामोरे जाणे अपेक्षित होते. महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशीच लढाई आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवार म्हणून जयश्री जाधव यांच्या विजयासाठी आम्ही पूर्णपणे तयार आहोत. निवडणुकीत आरोप-प्रत्यारोप समजू शकतो. मात्र, व्यक्तिगत टीका-टिप्पणी करणे हे चंद्रकांत पाटील यांना शोभत नाही.डी. वाय. पाटील ग्रुपची बदनामी त्यांनी सुरू केली आहे. डी. वाय. पाटील ग्रुपने साडेचार हजार जणांना नोकऱ्या दिल्या, त्यांची कुटुंबे उभे केली. डी. वाय. पाटील हॉस्पिटलच्या माध्यमातून लाखाे रुग्णांवर उपचार केले. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांनी व्यक्तिगत टीका-टिप्पणी करू नये, त्यांनी पुन्हा टीका केली तर मीही यादवापासून दिवाणजीपर्यंतच्या सगळ्या भानगडी बाहेर काढू, असा इशारा मंत्री पाटील यांनी दिला.

चंद्रकांत पाटील यांच्या चिठ्ठीवर अडमिशन

डी. वाय. पाटील ग्रुपच्या वतीने अनेकांना मदत केली आहे. माझ्यावर टीका करणाऱ्या चंद्रकांत पाटील यांनीही अनेक वेळा ॲडमिशन करून घेतली आहेत. आता त्याची यादी माझ्याकडे नाही, असल्या गोष्टी आम्ही लक्षात ठेवत नसल्याचा टोला मंत्री सतेज पाटील यांनी लगावला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलchandrakant patilचंद्रकांत पाटील