दत्तवाड सरपंचपदी चंद्रकांत कांबळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:37 IST2021-02-26T04:37:25+5:302021-02-26T04:37:25+5:30

दत्तवाड ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणुकीत यड्रावकर गटाच्या नूर काले युवाशक्ती पॅनलचे सहा उमेदवार निवडून आले आहे, तर नाना नेजे हे ...

Chandrakant Kamble as Dattawad Sarpanch | दत्तवाड सरपंचपदी चंद्रकांत कांबळे

दत्तवाड सरपंचपदी चंद्रकांत कांबळे

दत्तवाड ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणुकीत यड्रावकर गटाच्या नूर काले युवाशक्ती पॅनलचे सहा उमेदवार निवडून आले आहे, तर नाना नेजे हे अपक्ष म्हणून निवडून आले आहेत.

ग्रामपंचायत सभागृहात निवडीची विशेष बैठक घेण्यात आली. यावेळी सरपंचपदी कांबळे व उपसरपंचपदी नेजे यांचे एकमेव अर्ज दाखल झाले. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी अविनाश वायचळ यांनी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. यावेळी ग्रामविकास अधिकारी डी. आर. कांबळे, तलाठी अश्विनी खराडे, नूर काले, रफिक मुल्ला, आदिनाथ हेमगिरे, डी. एन. सिदनाळे, प्रकाश चौगुले, बाळीशा पोवाडी, तानाजी मोहिते, बाळासो कोकणे, अशोक चळनाईक, कल्लाप्पा कडाके, दीपक कांबळे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

फोटो - २५०२२०२१-जेएवाय-०३-सरपंच चंद्रकांत कांबळे, उपसरपंच नाना नेजे

Web Title: Chandrakant Kamble as Dattawad Sarpanch