चंदगड, राधानगरी, हातकणंगलेतील मतदान घटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2019 05:50 PM2019-09-03T17:50:06+5:302019-09-03T17:54:32+5:30

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नुकत्याच प्रसिद्ध करण्यात आलेल्या अंतिम मतदारयादीत चंदगड, राधानगरी व हातकणंगले मतदारसंघांतील मतदान पूर्वीपेक्षा काही हजारांनी घटल्याचे चित्र आहे.

Chandigarh, Radhanagari, Hatkanangale polls fall | चंदगड, राधानगरी, हातकणंगलेतील मतदान घटले

चंदगड, राधानगरी, हातकणंगलेतील मतदान घटले

Next
ठळक मुद्देचंदगड, राधानगरी, हातकणंगलेचे मतदान घटले: स्थलांतर, मयत, दुबार आदींमुळे नावे झाली कमी इतर सात विधानसभा मतदारसंघांत मतदान वाढले : अंतिम मतदार यादीतील माहिती

प्रवीण देसाई

कोल्हापूर : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नुकत्याच प्रसिद्ध करण्यात आलेल्या अंतिम मतदारयादीत चंदगड, राधानगरी व हातकणंगले मतदारसंघांतील मतदान पूर्वीपेक्षा काही हजारांनी घटल्याचे चित्र आहे तर उर्वरित सात विधानसभा मतदारसंघांत मतदारयाद्या पुनर्रिक्षण कार्यक्रमांतर्गत मतदान काही हजारांमध्ये वाढले आहे. या कार्यक्रमांतर्गत स्थलांतर, दुबार नावे आदी कारणांमुळे ही नावे वगळण्यात आल्याने मतदान पूर्वीपेक्षा काही प्रमाणांत कमी झाल्याचे दिसत आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दि. १ जानेवारी २०१९ या अर्हता दिनाकांवर आधारित दि. १५ जुलै ते ३० जुलै या कालावधीत मतदार याद्या पुनर्रिक्षणाचा कार्यक्रम घेण्यात आला. त्यामध्ये नावनोंदणीसह नाव वगळणीचे ही अर्ज घेण्यात आले. त्यामध्ये मृत, दुबार व स्थलांतरीत अशी नावे कमी झाल्याने चंदगड, राधानगरी, हातकणंगले मतदारसंघांतील मतदान घटले आहे.

चंदगडमध्ये पूर्वी ३ लाख १९ हजार २४६ इतके मतदान होते. ते आता ३ लाख १८ हजार ९१३ इतके झाले आहे. राधानगरीचे पूर्वी मतदान ३ लाख २६ हजार ३०८ इतके होते, ते आता ३ लाख २५ हजार ५३८ झाले आहे तर हातकणंगले मतदारसंघातील पूर्वी मतदान ३ लाख १८ हजार २४५ इतके होते, ते आता ३ लाख १७ हजार ६६८ इतके झाले आहे; तर वाढलेल्या मतदानामध्ये कागलमधील पूर्वीचे मतदान ३ लाख २१ हजार २६५ इतके होते ते आता ३ लाख २२ हजार ४६९, कोल्हापूर दक्षिणमध्ये पूर्वी ३ लाख २२ हजार ५७६ होते, ते आता ३ लाख २४ हजार ३६७, करवीरमध्ये पूर्वी ३ लाख २ हजार १३९ होते ते आता ३ लाख ३१ हजार ७७, कोल्हापूर उत्तरमध्ये पूर्वी २ लाख ८३ हजार ८८५ होते, ते आता २ लाख ८५ हजार ४४७, शाहूवाडीमध्ये पूर्वी २ लाख ८७ हजार ४१९ होते, ते आता २ लाख ८७ हजार ४४७, इचलकरंजीमध्ये पूर्वी २ लाख ९३ हजार १९६ इतके होते, ते आता २ लाख ९३ हजार २४३, शिरोळमध्ये पूर्वी ३ लाख १० हजार ८९९ इतके होते, ते आता ३ लाख १२ हजार ३९१ इतके झाले आहे.

साडेपाच हजार मतदान वाढले

अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होऊन यामध्ये जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघांत ३० लाख ९० हजार मतदारांची नोंद झाली आहे. त्यामध्ये तीन मतदारसंघातील घटले असून उर्वरीत सात मतदारसंघांतील मतदान वाढले आहे. वाढलेल्या मतदानामध्ये पूर्वीच्या तुलनेत ५ हजार ४८५ मतदानाची भर पडली आहे. पूर्वी जिल्ह्याचे मतदान ३ लाख ८५ हजार १७८ इतके होते.
 

 

Web Title: Chandigarh, Radhanagari, Hatkanangale polls fall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.