चंदगड तालुक्यात ४३१८२ नागरिकांनी घेतली कोरोना लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:21 IST2021-04-14T04:21:31+5:302021-04-14T04:21:31+5:30
चंदगड : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर १३ एप्रिलपर्यंत चंदगड तालुक्यात ४३,१८२ नागरिकांचे लसीकरण झाल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आर. के. ...

चंदगड तालुक्यात ४३१८२ नागरिकांनी घेतली कोरोना लस
चंदगड : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर १३ एप्रिलपर्यंत चंदगड तालुक्यात ४३,१८२ नागरिकांचे लसीकरण झाल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आर. के. खोत यांनी दिली.
चंदगड तालुक्यात एकूण सहा प्राथमिक आरोग्य केंद्रे, १० उपकेंद्रे अशा ११ ठिकाणांवरून लस देणे सुरू आहे. आरोग्यसेवेचे प्रमुख केंद्र असलेल्या तालुक्यातील सहाही प्राथमिक आरोग्य केंद्रांतून कोरोना लसीकरणाला नागरिकांचा प्रतिसाद मिळत आहे.
तालुक्यात लसीकरणाचे काम ७५ टक्के पूर्ण झाले आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांसह फ्रंटलाईनवर काम करणाऱ्या १८९४, ४५ ते ५९ वयोगटातील १७७४६, ६० वर्षांवरील २२३९५ व हेल्थ वर्कर ११४७ अशा एकूण ४३,१८२ नागरिकांचे लसीकरण झाले आहे.
तालुक्याची एकूण लोकसंख्या १,८६,०५३ असून, लसीकरणासाठी ५७८३६ इतके उद्दिष्ट आहे. ग्रामीण रुग्णालयासह कोवाड, माणगाव, हेरे, कानूर, अडकूर, तुडीये या प्राथमिक आरोग्य केंद्रांसह नागनवाडी, कार्वे, शिनोळी, कालकुंद्री, पाटणे, जंगमहट्टी, आमरोळी, तुर्केवाडी, राजगोळी, तांबूळवाडी याठिकाणी लसीकरण सुरू आहे.
दुसऱ्या लाटेतील रुग्णांची संख्या तालुक्यात अद्यापही नियंत्रणात आहे. मात्र, पुणे, मुंबईस्थित चाकरमानी गावी परतल्यास धोका वाढण्याची शक्यता आहे.