शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

चंदगड, गारगोटीला नगरपंचायतीचा दर्जा देऊ : डॉ. रणजित पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2018 17:28 IST

चंदगड व गारगोटी ग्रामपंचायतींना नगरपंचायतीचा दर्जा देण्याबाबत सरकार सकारात्मक विचार करीत असल्याचे लेखी आश्वासन नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी दिले. याबाबत आमदार सतेज पाटील यांनी प्रश्न उपस्थित केला होता, त्यास डॉ. पाटील यांनी लेखी कळविले आहे.

ठळक मुद्देचंदगड, गारगोटीला नगरपंचायतीचा दर्जा देऊ : डॉ. रणजित पाटील नगरविकास राज्यमंत्र्यांचे आश्वासन : सतेज पाटील यांचा पाठपुरावा

कोल्हापूर : चंदगड व गारगोटी ग्रामपंचायतींना नगरपंचायतीचा दर्जा देण्याबाबत सरकार सकारात्मक विचार करीत असल्याचे लेखी आश्वासन नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी दिले. याबाबत आमदार सतेज पाटील यांनी प्रश्न उपस्थित केला होता, त्यास डॉ. पाटील यांनी लेखी कळविले आहे.चंदगड ग्रामपंचायतीला नगरपंचायतीचा दर्जा मिळावा यासाठी मुंबई येथे मुख्यमंत्र्यांची ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने भेट घेतली होती. गारगोटी येथील ग्रामस्थांचीही तशी मागणी आहे; पण सरकार दोन्ही ग्रामस्थांना केवळ खेळवत आहे.ग्रामस्थांनी सतेज पाटील यांच्याकडेही नगरपंचायत स्थापन होण्याबाबत मागणी केली होती. त्यामुळे औचित्याच्या मुद्द्यावर चर्चा करताना सतेज पाटील यांनी, चंदगड आणि गारगोटी या ग्रामपंचायतींना नगरपंचायतीचा दर्जा मिळण्याच्या मागणीसाठी विधान परिषदेत १६ जुलै २०१८ रोजी प्रश्न उपस्थित केला होता.

त्याला उत्तर देताना, नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी, चंदगड आणि गारगोटी या ग्रामपंचायतींना नगरपंचायतीचा दर्जा देण्याबाबत सकारात्मक विचार करण्याचे लेखी आश्वासन दिले आहे.

शिवाय चंदगड आणि गारगोटी या ठिकाणी नगरपंचायती स्थापन करण्याबाबत १ मार्च २०१४ रोजी उद्घोषणा निर्गमित केली होती. मात्र ही उद्घोषणा वेळेत प्रसिद्ध झाली नसल्याने पुन्हा २ फेब्रुवारी २०१५ रोजी सुधारित उद्घोषणा प्रसिद्ध करण्यात आले आहे.

राज्यभरातील १२३ ग्रामपंचायतींना नगरपंचायतीचा दर्जा देण्यात आला आहे. नगरपंचायती स्थापन झाल्यानंतर त्या ठिकाणच्या नागरिकांना कार्यक्षम, लोकाभिमुख आणि प्रभावी प्रशासन उपलब्ध होण्याच्या दृष्टीने त्याचा लाभ झाला अथवा नाही, याचे मूल्यमापन करण्यात येत आहे.

त्यामुळे या मूल्यमापनाच्या अहवालानंतर मंत्रिमंडळाच्या उपसमितीसमोर चंदगड आणि गारगोटी यांचे प्रस्ताव ठेवून निर्णय घेण्याचे आश्वासन राज्यमंत्री डॉ. पाटील यांनी दिले आहे. 

 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलkolhapurकोल्हापूर