चंदगड संक्षिप्त बातम्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:07 IST2021-02-20T05:07:37+5:302021-02-20T05:07:37+5:30

चंदगड : येथील बाळ गावडे फौंडेशन आर्य चाणक्य करिअर अ‍कॅडमीतर्फे आज, शुक्रवारी सकाळी ६ वाजता हिंडगाव रोड येथे खुल्या ...

Chandgad Brief News | चंदगड संक्षिप्त बातम्या

चंदगड संक्षिप्त बातम्या

चंदगड : येथील बाळ गावडे फौंडेशन आर्य चाणक्य करिअर अ‍कॅडमीतर्फे आज, शुक्रवारी सकाळी ६ वाजता हिंडगाव रोड येथे खुल्या धावणे स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. मुले गटासाठी ५००१, ३००१, १००१, तर मुलींसाठी ३००१, २००१, १००१ अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत.

---- २) कोल्हापूरचा खंडोबा तालीम विजेता

गडहिंग्लज : येथील छत्रपती चषक फुटबॉल स्पर्धेत कोल्हापूरच्या खंडोबा तालीम मंडळाने स्थानिक गडहिंग्लजच्या शिवरत्न क्लबचा १-० ने पराभव करून विजेतेपद पटकाविले. स्पर्धेत खंडोबाचा गोलरक्षक आकाश मेस्त्री स्पर्धावीर ठरला. स्पर्धेत कट्टा ग्रुपने तृतीय, काळभैरव क्लबने चतुर्थ क्रमांक मिळविला. शहरातील एम. आर. हायस्कूलच्या मैदानावर ही स्पर्धा झाली.

---- २) किणेत आज रक्तदान शिबिर

पेरणोली : किणे (ता. आजरा) येथील शिवप्रतिष्ठान मंडळातर्फे आज, शुक्रवारी शिवजयंतीनिमित्त रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. मंडळातर्फे दरवर्षी विविध उपक्रमांनी साजरी करण्यात येणारी शिवजयंती यंदा कोरोनामुळे रक्तदान हा सामाजिक उपक्रम राबवून करण्यात येणार आहे.

----- ४) देवर्डेत नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार

पेरणोली : देवर्डे (ता. आजरा) येथील प्राथमिक शाळा व रवळनाथ हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने नूतन सरपंच व सदस्यांचा सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी केशव पाटील होते. मुख्याध्यापक सुनील सुतार यांनी स्वागत केले. यावेळी सरपंच गंगाधर पाटील, उपसरपंच संगीता चाळके यांच्यासह सदस्यांचा सत्कार झाला. यावेळी मुख्याध्यापक नामदेव माईणकर, संयोगीता सुतार, चंद्रकांत घुरे, राजेंद्र पाटील, देवेंद्र शिखरे, विशाल आढाव, सरोजनी कुंभार, रेश्मा बोलके, वंदना चव्हाण, आदी उपस्थित होते.

---------- ५) गवसेमध्ये विद्यार्थ्यांना मदत

चंदगड : गवसे (ता. चंदगड) येथील प्राथमिक शाळेतील सलोनी फाटक, श्रीधर फाटक या होतकरू विद्यार्थ्यांना गजानन पतसंस्थेतर्फे शैक्षणिक साहित्य आणि काशिनाथ कुंदेकर व शिक्षकांकडून दहा हजारांची ठेव विद्यार्थ्यांच्या नावे ठेवण्यात आली. यावेळी एन. डी. पाटील, राजेंद्र भोसले, परशराम मांडेकर, आयुब आजगेकर, मोहन इलगे, रघुनाथ पाटील, सागर कांबळे, रवी तराळ, आदी उपस्थित होते.

------ ६) मोरेवाडी-धनगरवाड्यावर विकासकामांना प्रारंभ

पेरणोली : वाटंगी (ता. आजरा) येथील धनगरवाड्यावर गावांतर्गत रस्ता खडीकरण व डांबरीकरण कामाचा प्रारंभ सभापती रचना होलम यांच्या हस्ते झाला. यावेळी अल्बर्ट डिसोझा, सरपंच शिवाजी नांदवडेकर, उपसरपंच मंगल वांद्रे, विजय देसाई, बाळू पोवार, शिवाजी गिलबिले, रोमन करवालो, नारायण वांद्रे, कोंडिबा आडूळकर, आदी उपस्थित होते.

Web Title: Chandgad Brief News

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.