शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

पक्षीय मर्यादेत कामाचे महाडिकांसमोर आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2019 00:55 IST

समीर देशपांडे । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : गेल्या ३0-३५ वर्षांमध्ये महाडिक परिवाराला प्रथमच पक्षीय मर्यादेत काम करावे लागणार ...

समीर देशपांडे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : गेल्या ३0-३५ वर्षांमध्ये महाडिक परिवाराला प्रथमच पक्षीय मर्यादेत काम करावे लागणार आहे. ज्या पद्धतीने धनंजय महाडिक यांना भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर पाचव्या दिवशी राज्य उपाध्यक्षपद देण्यात आले, ते पाहता या पक्षाशी एकनिष्ठ राहून भाजप तळागाळांत रुजविण्याची कामगिरी झोकून देऊन महाडिक यांना पार पाडावी लागणार आहे.महादेवराव महाडिक यांनी त्या त्यावेळी गरज असेल त्या पद्धतीचे राजकारण करताना अगदी कॉँग्रेसचे विधान परिषदेचे दोनवेळा आमदार असतानाही पक्ष, गट, तट, विचारधारा यांचा फारसा विचार केला नाही. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत धनंजय महाडिक यांनी सुरुवातीला शिवसेनेतून लोकसभा लढविली. ते हरले. दुसऱ्यांदा त्यांना उमेदवारी मिळाली नाही आणि त्यांनी आपली ताकद सदाशिवराव मंडलिक यांच्या पाठीमागे लावली.नंतर मात्र राष्ट्रवादीच्या ‘घड्याळ’ चिन्हावर ते खासदार झाले; परंतु तिसऱ्यांदा त्यांचा दारुण पराभव झाला. महाराष्ट्रामध्ये युतीची सत्ता आल्यानंतर त्यांचे स्वकियांशी कधी पटले नाही. मात्र, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे ते निकटवर्तीय बनले, ही वस्तुस्थिती आहे. सतेज पाटील यांच्याविरोधात घेतलेल्या भूमिकेचा फटका बसून लोकसभेला त्यांचा पराभव झाला आणि अपेक्षेप्रमाणे ते भाजपमध्ये प्रवेशकर्ते झाले.आता भाजपचा राज्य उपाध्यक्ष म्हणून काम करताना त्यांना बंधू अमल यांचा उघड प्रचार करता येणार आहे. अन्य सर्वच विधानसभा मतदारसंघांमध्ये त्यांना युती झाली नाही तर ‘कमळ’ एके ‘कमळ’ आणि युती झाली तर ‘कमळ’ आणि ‘धनुष्यबाण’ यांचा प्रचार करावा लागणार आहे. ‘मला लोकसभेला विरोध करणाºयांचा मी ‘कार्यक्रम’ करणार आहे,’ असे सांगताना युती झाली तर त्यांना युती धर्म पाळावा लागणार आहे. प्रत्येक तालुक्यातील भाजपचे जुने आणि नवे कार्यकर्ते, राष्ट्रवादीतून त्यांच्यासमवेत जे काही येतील ते आणि त्यांच्या युवाशक्तीचे कार्यकर्ते यांचा मिलाफ घडवून त्यांना काम करावे लागेल.चार वर्षे गुंतवणूक करावी लागेलसांगलीत, सोलापुरात आणि कोल्हापुरात वेगवेगळी भूमिका घेण्यावरही मर्यादा येणार आहेत. अशा पद्धतीने त्यांनी गुंतवणूक केल्यास त्यांना ‘भाजप’मध्ये चांगले भवितव्य असल्याचे मानले जाते. त्याचाच एक भाग म्हणून त्यांना विधानसभा निवडणुकीनंतर दिल्लीतील एखादे पद देण्याचाही ‘शब्द’ देण्यात आला आहे.