शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: पन्हाळ्यात ‘जनसुराज्य’ला रोखण्याचे आव्हान; शिंदेसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादीच्या भूमिकेकडे लक्ष 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2025 17:52 IST

काही ठिकाणी बंडखोरी होणार

सरदार चौगुलेपोर्ले तर्फ ठाणे : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी तालुक्यातील नेत्यांनी जोडण्या लावण्यास सुरुवात केली आहे. तालुक्यात ‘जनसुराज्य’ला विरोध म्हणून महाविकास आणि महायुतीच्या नेत्यांनी मोट बांधण्याची तयारी केली आहे. आमदार विनय कोरे यांच्या सूक्ष्म नियोजनाला विरोधक कसे उत्तर देतात, याकडे तालुक्याचे लक्ष आहे.तालुक्यात जिल्हा परिषदेचे सहा गट, तर पंचायत समितीचे बारा गण आहेत. प्रारूप रचनेत बदल न झाल्याने इच्छुकांनी नि:श्वास टाकला आहे. आमदार विनय कोरे यांच्या पक्षाची प्रत्येक मतदारसंघात ताकद आहे. बेरजेच्या राजकारणामुळे जनसुराज्यमध्ये इच्छुकांची संख्या जास्त आहे. अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर यांची पक्षाकडून अपेक्षा आहे. माजी आमदार सत्यजित पाटील यांच्यासह डॉ. जयंत पाटील यांच्याशी त्यांचे राजकीय सख्य आहे. पन्हाळ्याच्या पश्चिम भागात शिंदेसेनेचे आमदार चंद्रदीप नरके यांचे वर्चस्व आहे. गतवेळी सत्तेत नसताना नरके यांनी एका जिल्हा परिषदेसह, चार जागा पंचायत समितीच्या जिंकल्या होत्या. आता ते सत्तेबरोबर आहेत. भाजप तीन जागांवर लढण्याच्या तयारीत असला, तरी त्यांचे कोणाशी कसे गणित जुळते, यावरच पुढील राजकारण अवलंबून आहे. तडजोडीच्या राजकारणात राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. तालुक्यात इतर पक्ष संघटनांची ताकद ज्या-त्या मतदारसंघात निर्णायक ठरत असल्याने निवडणुकांचे आखाडे बांधताना याचा विचार करावा लागणार आहे.

गतवेळचे बलाबलजिल्हा परिषद ६ जागा

  • जनसुराज्य पक्ष - ३
  • बाबासाहेब पाटील (अजित पवार) - १
  • भाजपा - १
  • चंद्रदीप नरके (शिंदेसेना) - १

पंचायत समिती १२ जागा

  • जनसुराज्य पक्ष - ८
  • महाविकास आघाडी - ४

जनसुराज्यची शक्तीगतवेळी जनसुराज्याने जिल्हा परिषदेसह पंचायत समितीच्या सर्वच जागा लढवल्या होत्या. भाजपने मैत्रिपूर्ण लढतीत यवलुज मतदारसंघातून विजय मिळवला होता. जनसुराज्यच्या विरोधात शिंदेसेनेचे आमदार चंद्रदीप नरके, उद्धवसेनेचे सत्यजित पाटील, बाबासाहेब पाटील आसुर्लेकर, काॅंग्रेसचे अमर पाटील, डाॅ. जयंत पाटील यांनी महाविकास आघाडी केली होती. तर पी. एन. पाटील गट स्वतंत्र लढला होता. जनसुराज्यने पंचायत समितीच्या ८, तर जिल्हा परिषदेत ३ जागा जिंकून तालुक्याच्या राजकारणावर वर्चस्व निर्माण केले होते.

समीकरणे बदलली..राज्याच्या सत्ता पालटानंतर तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलली आहेत. ‘गोकुळ’चे संचालक अमर पाटील यांनी विधानसभेला विनय कोरे यांना उघड पाठिंबा देऊन जिल्हा परिषदेचा शब्द घेतल्याची चर्चा आहे. भाजपने युती धर्म पाळत करवीरचे आमदार चंद्रदीप नरके यांना विधानसभेला मदत केल्याने मतदारसंघात भाजपला जागा मिळण्याची अपेक्षा आहे. राष्ट्रवादीचे बाबासाहेब पाटील यांची जिल्हाध्यक्ष पदामुळे राजकीय ताकद वाढल्याने उमेदवारीसाठी कार्यकर्त्यांचा आग्रह आहे.

आरक्षणावर चित्रसत्तेत असणाऱ्या पक्षातील कार्यकर्त्यांना विजयाची खात्री वाटत आहे. आरक्षण सोडतीनंतरच लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे. विधानसभेत शब्द दिलेल्या मतदारसंघात उलटसुलट आरक्षण पडले, तर उमेदवाराची घोषणा करताना नेत्यांची कसोटी, तर नाराजांची मनधरणी करताना दमछाक होणार आहे.