शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

राजू शेट्टी यांच्या विरोधात मोदींनाच उभे करण्याचे स्वाभिमानीचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2017 18:06 IST

भाजपमध्ये दम असेल तर त्या पक्षाने हातकणंगले मतदार संघातून राजू शेट्टी यांच्या विरोधात मोदी यांना रिंगणात उतरवावे, त्यांना पळता भुई थोडी करू असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ऊस परिषदेत देण्यात आला. या परिषदेसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राज्यभरातील शेतकऱ्यांची प्रचंड उपस्थिती आहे.

ठळक मुद्देजयसिंगपूरात ऊस परिषदेस प्रारंभहातकणंगलेमधून भाजपला पळता भुई थोडी करुस्वाभिमानी शेतकरी संघटनेचा इशारा

कोल्हापूर , दि. २८ : भाजपमध्ये दम असेल तर त्या पक्षाने हातकणंगले मतदार संघातून राजू शेट्टी यांच्या विरोधात मोदी यांना रिंगणात उतरवावे, त्यांना पळता भुई थोडी करू असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ऊस परिषदेत देण्यात आला. या परिषदेसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राज्यभरातील शेतकऱ्यांची प्रचंड उपस्थिती आहे.स्वाभिमानी शेतकरी संघटनेची सोळावी ऊस परिषद सुरु असून त्याला शेतकऱ्यांचा प्रचंड प्रतिसाद आहे. खासदार राजू शेट्टी ज्या मार्गावरून परिषद स्थळी येणार आहेत, त्या मार्गावर फुलांच्या पायघड्या घातल्या आहेत. येतांना त्यांच्या अंगावर शेतकऱ्यांनी फुलांची उधळण करुन त्यांचे स्वागत केले आहे. आता प्रतिक्षा आहे, ती त्यांच्या भाषणाची. या परिषदेत उसाचा अंतिम दर ते जाहीर करणार आहेत.स्वाभिमानीने खा.राजू शेट्टी यांच्या विरोधात थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच रिंगणात उतरण्याचे आवाहन केले आहे. यामुळे स्व. मंडलिक यांनी २००९ लोकसभा निवडणूकीत थेट केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांना आवाहन केल्याची आठवण कार्यकर्त्यांना झाली. या सभेत शेतकरी नेते जालंदर पाटील, रविकांत तुपकर यांचीही भाषणे झाली. त्यांनीही आपल्या भाषणात सरकारवर टीका केली.सतीश काकडे यांची खालच्या पातळीवरुन टीकासदाभाऊ बारामतीला आल्यास त्यांना कपडे फाटेपर्यंत मार देऊ, त्याला घरात घेऊ नका. आपले वासे मोजल्याशिवाय राहणार नाही. हे बेणं आमच्यासमोर दारू पीत असे अशी अत्यंत खालच्या पातळीवरील टीका शेतकरी कृषी समितीचे अध्यक्ष सतीश काकडे यांनी सतीश काकडे यांनी या सभेत केली.जयसिंगपूर येथे आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेची १६ वी ऊस परिषद सुरु झाली आहे. दरवर्षी या परिषदेनंतर उसाचे राजकारण पेटते त्यामुळे संपूर्ण राज्याचे लक्ष या परिषदेकडे लागून असते. यावर्षीची ऊस परिषद सदाभाऊ खोतांशिवाय होत आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना सरकारमधून बाहेर पडली आहे. सदाभाऊ खोतही स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून बाहेर पडून नव्या रयत क्रांती संघटनेची स्थापना केली आहे.ऊस परिषदेपूर्वीच राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी शेट्टी यांच्यावर टीका करत उसाचा दर म्हणजे मटक्याचा आकडा नाही अशी टीका केली होती. आता या सर्व पार्श्वभूमीवर राजू शेट्टी आपल्या भाषणात काय बोलणार याकडे सगळ्यांचे कान लागले आहेत.

दरवर्षी ऊस परिषदेनंतर राजू शेट्टी साखरेच्या दरासाठी आंदोलन करून कारखानदार आणि सरकारला वेठीस धरतात. या ऊस परिषदेनंतर राजू शेट्टीच्या आंदोलनाचा काय पवित्रा असणार आहे याच्या कडे कारखानदार आणि सरकारचे डोळे आहे. या ऊस परिषदेत राजू शेट्टीच्या भाषणाची उत्सुकता लागून आहे.

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीFarmerशेतकरी