२८ कोटींच्या ‘एलईडी’त ‘उजेड’ पाडण्याची धडपड

By Admin | Updated: December 11, 2014 00:32 IST2014-12-11T00:19:20+5:302014-12-11T00:32:13+5:30

सल्लागाराचा ‘खो’ : डिसेंबरअखेर मंजुरीची घाई

The challenge of 'light' in '28 million' LED ' | २८ कोटींच्या ‘एलईडी’त ‘उजेड’ पाडण्याची धडपड

२८ कोटींच्या ‘एलईडी’त ‘उजेड’ पाडण्याची धडपड

कोल्हापूर : विजेची ५० टक्के व खर्चातही मोठी बचत करणारे अत्याधुनिक २३ हजार एलईडी बल्ब संपूर्ण शहरभर बसविण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. २८ कोटींच्या या प्रकल्पाचा संपूर्ण खर्च ठेकेदार करणार आहे. सध्याच्या ५८ लाख रुपये वीज बिलातून तब्बल २५ लाख रुपयांच्या होणाऱ्या बचतीचे पैसे ठेकेदारास देऊन त्याबदली प्रकल्पाचे पैसे भागविले जाणार आहेत. मात्र, या प्रकल्पाला ‘खो’ घालण्यासाठी दबावतंत्राचा वापर करीत सल्लागार नेमण्याची टूम काढल्याची चर्चा महापालिकेत सुरू आहे.
‘लक्स’ तंत्रज्ञानावर आधारित हे बल्ब तब्बल दहावर्षे म्हणजेच जवळपास ५२ हजार तास चालणार आहेत. प्रकल्पकाळात पाच वर्षे देखभाल दुरुस्तीचा खर्च ठेकेदारच करणार आहे. या प्रकल्पासाठी महानगरपालिकेला एक रुपयाचीही गुंतवणूक करावी लागणार नाही. त्यामुळे नजीकच्या सहा महिन्यांत अवघे शहर पांढऱ्याशुभ्र प्रकाशाने न्हाऊन निघण्याची शक्यता आहे.
प्रकल्पाची जाहीर निविदा २९ डिसेंबरला खुली करून ३० डिसेंबरला ठेकेदार निश्चित केला जाणार आहे. स्थायी सभापतींची मुदत ३१ डिसेंबरला संपण्यापूर्वी ‘स्थायी’ची बैठक बोलावून निविदेला अंतिम स्वरूप देण्याची लगबग सुरू आहे. मात्र, पुढील दहा महिन्यांसाठी स्थायी समिती सभापतिपद राष्ट्रवादीकडे जाणार आहे. त्यामुळे २८ कोटींचा ‘उजेड’ आपल्या कारकिर्दीतच पडावा, यासाठी पडद्यामागे जोरदार हालचाली सुरू आहेत. प्रकल्प लांबणीवर पडावा, यासाठीच सल्लागार कंपनीसह निविदेतील अटी, शर्ती बदलण्याचा घाट घातला जात असल्याची नगरसेवकांत चर्चा आहे. (प्रतिनिधी)


महापालिकेची आर्थिक स्थिती पाहता अशा प्रकल्पासाठी पैसे उपलब्ध होणे अशक्य आहे. अशा पद्धतीचे प्रकल्प नाशिक, लातूर, पुणे शहरांत सुरू आहेत. मुदत संपल्यानंतर महापालिकेला महिन्याकाठी त्यावेळच्या विजेच्या दराप्रमाणे किमान ५० लाखांची मासिक बचत होईल. सर्वांशी चर्चा करून अटी व शर्तींमध्ये बदल केला जाणार आहे. महापालिकेला दरमहा दहा टक्के विजेच्या बचतीतील हिस्सा देण्याचाही प्रस्ताव आहे. अशा प्रक ल्पामुळे विजेसारख्या राष्ट्रीय संपत्तीची यामुळे बचत होईल.
- सचिन चव्हाण
(स्थायी समिती सभापती)

Web Title: The challenge of 'light' in '28 million' LED '

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.