दिव्यांगांच्या प्रलंबित मागण्यांसाठी पालिका प्रवेशद्वारावर चक्री उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:01 IST2021-01-13T05:01:22+5:302021-01-13T05:01:22+5:30
इचलकरंजी : दिव्यांगांच्या प्रलंबित मागण्यांसाठी येथील सावली दिव्यांग संस्थेने सोमवारी नगरपालिकेच्या प्रवेशद्वारात चक्री उपोषण केले. पालिकेच्या विरोधात घोषणाबाजी करत, ...

दिव्यांगांच्या प्रलंबित मागण्यांसाठी पालिका प्रवेशद्वारावर चक्री उपोषण
इचलकरंजी : दिव्यांगांच्या प्रलंबित मागण्यांसाठी येथील सावली दिव्यांग संस्थेने सोमवारी नगरपालिकेच्या प्रवेशद्वारात चक्री उपोषण केले. पालिकेच्या विरोधात घोषणाबाजी करत, लेखी आश्वासन मिळाल्याशिवाय हे उपोषण मागे घेणार नसल्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
दिव्यांगांना मागील वर्षातील पाच टक्के निधी, कोरोना व लॉकडाऊन काळातील सानुग्रह अनुदान, दिव्यांग उन्नती अभियानांतर्गत पात्र लाभार्थ्याला लाभ व पाच टक्के राखीव गाळे याबाबत नगरपालिकेने कोणतीच कार्यवाही केली नाही. अनेकवेळा निवेदने देऊन व आंदोलन करूनही प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचे उपोषणकर्त्यांनी सांगितले. उपोषणात राजकुमार गेजगे, भगवान कदम, नाना दातार, राजेश पाटील, तुकाराम गवळी, संदीप भगत आदी सहभागी झाले होते.
(फोटो ओळी)
११०१२०२१-आयसीएच-०२
दिव्यांगांच्या प्रलंबित मागण्यांसाठी येथील सावली दिव्यांग संस्थेने सोमवारी नगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर चक्री उपोषण केले.
(छाया-उत्तम पाटील)