जिल्हा परिषदेतर्फे नाभिक बांधवांना खुर्च्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:25 IST2021-03-17T04:25:29+5:302021-03-17T04:25:29+5:30
कोल्हापूर : नाभिक बांधवांना व्यवसायासाठी मदत म्हणून खुर्च्या देण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला आहे. यासाठीचे अर्ज ...

जिल्हा परिषदेतर्फे नाभिक बांधवांना खुर्च्या
कोल्हापूर : नाभिक बांधवांना व्यवसायासाठी मदत म्हणून खुर्च्या देण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला आहे. यासाठीचे अर्ज वितरण सुरू झाले असून जिल्हा परिषद सदस्यांच्या मार्फत इच्छुकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन अध्यक्ष बजरंग पाटील यांनी केले आहे.
शिक्षण व अर्थ समिती सभापती प्रवीण यादव यांच्या संकल्पनेतून नाभिक बांधवांसाठी ही योजना आखण्यात आली. यामध्ये प्रत्येक लाभार्थ्याला एक खुर्ची घेण्यासाठी ३७५० रुपये अनुदान देण्यात येणार आहे. प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर लाभार्थ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा करण्यात येणार आहेत. यासाठी २५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली असून ६९३ जणांना याचा लाभ देण्यात येणार आहे.
१९ मार्चपर्यंत पंचायत समितीच्या पातळीवर संबंधितांनी अर्ज भरून आधार कार्ड, उत्पन्नाचा दाखला, नाभिक व्यवसाय करीत असल्याचा सरपंच आणि ग्रामसेवक यांचा दाखला ही कागदपत्रे जमा करावीत असे आवाहन करण्यात आले आहे.