वाठारमध्ये खरेदीच्या बहाण्याने चेन स्नॅचिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:03 IST2021-01-13T05:03:48+5:302021-01-13T05:03:48+5:30

पेठवडगाव : दुकानात खरेदीच्या बहाण्याने आलेल्या अज्ञात संशयिताने महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून पळ काढला. ही ...

Chain snatching under the pretext of shopping in Wathar | वाठारमध्ये खरेदीच्या बहाण्याने चेन स्नॅचिंग

वाठारमध्ये खरेदीच्या बहाण्याने चेन स्नॅचिंग

पेठवडगाव : दुकानात खरेदीच्या बहाण्याने आलेल्या अज्ञात संशयिताने महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून पळ काढला. ही घटना वठार तर्फ वडगाव येथील हनुमान चौकात दुपारी ३ वाजता घडली. याबाबत निखिता बंडा अतिग्रे यांनी फिर्याद दिली आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत निशाणदार करीत आहेत. निखिता अतिग्रे यांचे हनुमान मंदिरानजीक रेणुका कलेक्शन व कटलरी दुकान आहे. यामध्ये दुपारी ३च्या सुमारास तोंड बांधलेल्या अज्ञात युवकाने व्हॅासनिल पाहिजे, असे म्हणत दुकानात प्रवेश केला. त्याचवेळी संशयिताने अतिग्रे यांच्या गळ्यातील दीड तोळ्याचे ४५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून पळ काढला.

घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, गुन्हा अन्वेषण विभागाचे

पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांनी भेट देऊन माहिती घेतली.

Web Title: Chain snatching under the pretext of shopping in Wathar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.