शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कुणबी असूनही कागदोपत्री नोंद नसेल तरीही दाखला, गृह चौकशीच्या अहवालाची तरतूद 

By भीमगोंड देसाई | Updated: November 24, 2023 12:57 IST

इतर आरक्षित जातींनाही लागू

भीमगोंडा देसाईकोल्हापूर : कुणबीसह आरक्षणात असलेल्या इतर जातींच्या व्यक्तींकडे जुन्या कागदोपत्री पुराव्याच्या नोंदी नसतील तरीही सक्षम प्राधिकाऱ्यांच्या गृह चौकशी अहवालाच्या आधारे दाखला देण्याची तरतूद आहे. महसूलमधील प्रांताधिकारी आणि समाजकल्याण विभागाकडील जातपडताळणी समितीकडील अधिकाऱ्यांकडून गृह चौकशी करून अहवाल घेतला जातो. सध्या कुणबी नोंद शोधमोहीम सुरू आहे. यामध्ये कुणबी आहे, पण नोंदी नाहीत, अशा तक्रारींचा सूर निघत आहे. या पार्श्वभूमीवर महसूल आणि समाज कल्याणच्या यंत्रणेकडून घेतलेल्या माहितीतून हे समोर आले आहे.

इतर मागासवर्ग प्रवर्गातील कुणबीसह इतर जातींचा दाखला काढण्यासाठी १९६७ तर अनुसूचित जाती, जमातीचा दाखल्यासाठी १९५०, विमुक्त जाती, भटक्या जमातीसाठी १९६१ पूर्वीचा, विशेष मागास प्रवर्गासाठी १९६७ पूर्वीचा महसुली, शैक्षणिक आदी शासकीय कागदोपत्री पुरावा असणे बंधनकारक आहे. मात्र, आरक्षणात असलेल्या अनेक कुटुंबांकडे कागदोपत्री पुरावे सापडत नाहीत. जातीसंबंधीच्या शब्दात स्पष्टता नसते. यामुळे संबंधितास जातीचा दाखला मिळत नाही. केवळ कागदाेपत्री पुरावा नाही म्हणून जातीच्या दाखल्यापासून वंचित राहून नुकसान होऊ नये म्हणून सक्षम प्राधिकाऱ्यांच्या गृह चौकशी अहवालावरून दाखला मिळू शकतो. मात्र, यासंबंधीची व्यापक प्रमाणात जनजागृती नाही. या कार्यपद्धतीचा अवलंब करण्यास शासकीय यंत्रणा सहजपणे तयार होत नसल्याच्या तक्रारी आहेत.कुणबी शोधमोहिमेत आतापर्यंत सापडलेल्या नोंदीत चंदगड, शिरोळ तालुक्याची पाटी कोरीच आहे. कोल्हापूर शहर, गडहिंग्लज तालुक्यातीत नोंदीही नगण्य आहेत. येथील मराठा समाजातील रोटीबेटीचे व्यवहार इतर तालुक्यात कुणबी नोंद सापडलेल्या कुटुंबात आहेत. यामुळे आम्हीही कुणबी आहे, पण जुन्या काळी नोंद करणारी यंत्रणा सक्षम नव्हती, त्यामुळे कुणबीच्या नोंदीत आमचा समावेश होत नसल्याचा सूर निघत आहे.

म्हणूनच एखादी जात आरक्षणात आहे पण कागदोपत्री पुरावा नसला तरी जातीचे प्रमाणपत्र देण्याची प्रचलित तरतूद आहे. यासाठी गृह चौकशी करून शासकीय यंत्रणेला ती व्यक्ती आरक्षित जातीत आहे, हे शोधावे लागते. याच कार्यपद्धतीतून कुणबी आहे, पण नोंद नसेल तरीही दाखला मिळणार आहे.

गृह चौकशीत काय पाहिले जाते ?गृह चौकशीत संबंधित व्यक्तीचे जुने घर कोणत्या समाजाच्या वस्तीत आहे, त्याची जुनी देव-दैवते कोणती आहेत, रोटीबेटी व्यवहार कसे असतात, जन्म-मृत्यूनंतरच्या विधी, परंपरा कशा असतात यासह जुन्या, चाली-रिती, परंपरांचा शोध घेतला जातो. याशिवाय गावातील लोकांचे जबाब नोंदवून घेतले जातात.

कोणाला अधिकार आहेत ?जातीचा दाखला देण्याचा अंतिम अधिकार प्रांताधिकारी यांना तर तो पडताळणी करून मान्यता देण्याचे अधिकार समाजकल्याण विभागाकडील जात पडताळणी समितीच्या अध्यक्षांना आहे. गृह चौकशीचा अधिकार प्रांताधिकारी आणि जात प्रमाणपत्र समितीने नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांना आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMaratha Reservationमराठा आरक्षणCaste certificateजात प्रमाणपत्र