वॉर रूमबाबत सीईओंनी घेतला आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:23 IST2021-05-15T04:23:02+5:302021-05-15T04:23:02+5:30

कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी शुक्रवारी जिल्हा परिषदेतील कोरोना वॉर ...

CEO reviews the war room | वॉर रूमबाबत सीईओंनी घेतला आढावा

वॉर रूमबाबत सीईओंनी घेतला आढावा

कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी शुक्रवारी जिल्हा परिषदेतील कोरोना वॉर रूमबाबत आढावा घेतला.

सर्व विभागप्रमुख आणि वॉर रूममधील कर्मचारी यांना त्यांनी ही वॉररूम कशासाठी सुरू केली आहे, याची माहिती दिली. बाराही तालुक्यातील अधिकारी आणि जिल्हा परिषद मुख्यालय यांच्यामध्ये समन्वय रहावा, स्थानिक पातळीवर अडचणी तातडीने समजाव्यात, त्यावर उपाय शोधण्यासाठी तातडीने कार्यवाही व्हावी यासाठी हा वॉर रूम सुरू करण्यात आली आहे.

अनेक तालुक्यांचे काॅन्टक्ट ट्रेसिंगही कमी होत आहे. त्याच्यासाठीही पाठपुरावा या वॉर रूमच्या माध्यमातून केला जावा, अशा अपेक्षा चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केल्या. कोणत्याही परिस्थितीत नेमून दिलेल्या वेळेत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी उपस्थित राहिलेच पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: CEO reviews the war room