शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

कोल्हापूर जिल्हा बँकेचे ‘सीईओ’ ए. बी. माने राज्य बँकेचे मुख्य सरव्यवस्थापक, रिझर्व्ह बँकेची शिफारस 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2023 12:49 IST

जिल्हा बँकांच्या अधिकाऱ्यांमधून मुख्य सरव्यवस्थापकपदी निवड होणारे डॉ. माने हे पहिलेच अधिकारी आहेत

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए. बी. माने यांची महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या मुख्य सरव्यस्थापकपदी नियुक्ती झाली. जिल्हा बँकांच्या अधिकाऱ्यांमधून मुख्य सरव्यवस्थापकपदी निवड होणारे डॉ. माने हे पहिलेच अधिकारी आहेत. रिझर्व्ह बँक व नाबार्डच्या तज्ज्ञ अधिकाऱ्यांच्या पॅनेलने मुलाखती घेऊन डॉ. माने यांची नियुक्ती केली.रिझर्व्ह बँकेने बँकिंग क्षेत्रातील संशोधन व प्रशिक्षणासाठी स्थापन केलेल्या पुणे येथील राष्ट्रीय बँकिंग प्रबंधन संस्थेमध्ये त्यांनी संशोधन अधिकारी म्हणून काम केले. गुजरातमधील अहमदाबाद येथील व्यावसायिकता विकास संस्थेमध्ये त्यांनी फॅकल्टी म्हणूनही काम केले आहे.गेल्या २५ वर्षांत जिल्हा बँकेत कृषी अधिकारी, बीडीएस विभागामध्ये प्रकल्प अधिकारी, सीएमए सेलचे उपव्यवस्थापक, तसेच अकाउंट्स बँकिंग, शेती कर्जे, प्रशासन, सीएमए सेल, वसुली, ऑडिट, माहिती तंत्रज्ञान या विभागांचे व्यवस्थापक अशा विविध विभागांत वरिष्ठ पदांवर काम केले. २०१४ मध्ये प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी व २०१८ पासून नियमित मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून केले. ३१ मार्च २०२३ सेवानिवृत्त झाल्यानंतरही बँकेने त्यांना दोन वर्षांची मुदतवाढ दिली होती.

प्रभारी ‘सीईओ’पदी जी. एम. शिंदेडॉ. माने हे राज्य बँकेत गेल्याने त्यांच्या ठिकाणी प्रशासन व बोर्ड विभागाचे व्यवस्थापक जी. एम. शिंदे यांच्याकडे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून जबाबदारी देण्यात आली.

आमदार हसन मुश्रीफ हे १९९७ बँकेचे अध्यक्ष असताना बँकेत लेखी व तोंडी परीक्षा दिली होती. त्यावेळी गुणवत्तेनुसार त्यांनी व संचालक मंडळाने मला बँकेच्या सेवेमध्ये सामावून घेतले. त्यांनी संधी दिल्यानेच आज शिखर बँकेमध्ये जाता आले. - डॉ. ए. बी. माने 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरbankबँक