केंद्रातील सरकार धनदांडग्यांना पोसणारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:29 IST2021-02-25T04:29:54+5:302021-02-25T04:29:54+5:30

: मुरगूडमध्ये कॉ. गोविंद पानसरे यांचा स्मृती दिन मुरगूड : साठेबाजीविरोधी कायदा रद्द करून राष्ट्रीयीकृत बँका विक्रीस काढण्याचे शासनाचे ...

The central government feeds the rich | केंद्रातील सरकार धनदांडग्यांना पोसणारे

केंद्रातील सरकार धनदांडग्यांना पोसणारे

:

मुरगूडमध्ये कॉ. गोविंद पानसरे यांचा स्मृती दिन

मुरगूड : साठेबाजीविरोधी कायदा रद्द करून राष्ट्रीयीकृत बँका विक्रीस काढण्याचे शासनाचे कृत्य भांडवलदारांना पोसण्याचे आहे. बँकेतील पैसा देशातील अन्नधान्य खरेदी करून साठेबाजी करण्यासाठी वापरला जाण्याची भीती आहे. त्यामुळे देशातील सार्वजनिक वितरण व्यवस्था मोडून पडेल. जीवनावश्यक वस्तू सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जातील. हे सरकार धनदांडग्यांना पोसणारे असून कृत्रिम टंचाईत देश होरपळून जाईल, अशी भीती प्रा आनंद मेणसे यांनी व्यक्त केली.

मुरगूड ता. कागल येथील समाजवादी प्रबोधिनीच्या शाखेत कॉ. गोविंद पानसरे यांच्या सहाव्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित व्याख्यान कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी अतुल दिघे होते.

सृजन शिल्पकार पुरस्कार प्राप्त एम. डी. रावण, उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार प्राप्त एस. पी. कांबळे, सुंदर शाळा उपक्रमातील अभिजित यादव यांचा सत्कार करण्यात आला. कॉ. शिवाजी मगदूम, कॉ. बबन बारदेस्कर, नगरसेवक नामदेवराव मेंडके, मारुती कांबळे, गजाननराव गंगापुरे, अशोक दरेकर, विश्वनाथ शिंदे, विलास भारमल, प्रकाश भोसले, पी. व्ही. पाटील, वसंत निकम, महादेव खराडे, सुखदेव वरपे, सुखदेव लोकरे, भिकाजी कांबळे उपस्थित होते.

स्वागत व प्रास्ताविक बी. एस. खामकर यांनी, तर सूत्रसंचालन समीर कटके यांनी केले, आभार दलितमित्र दत्ता चौगुले यांनी मानले.

फोटो ओळ:-

समाजवादी प्रबोधिनीच्या मुरगूड शाखेच्यावतीने कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या शहीद दिनानिमित्त आयोजित व्याख्यान कार्यक्रमात बोलताना प्राचार्य आनंद मेणसे यांच्यासह मंचावर उपस्थित कॉम्रेड शिवाजीराव मगदूम, अतुल दिघे, डी. डी. चौगले आदी.

Web Title: The central government feeds the rich

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.