गडहिंग्लजला यंदाही केंद्रीय प्रवेश प्रक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:28 IST2021-08-21T04:28:13+5:302021-08-21T04:28:13+5:30
गडहिंग्लज शहरात एकूण आठ कनिष्ठ महाविद्यालये आहेत. त्यांतील अनुदानित तुकडीतील प्रवेश क्षमता ५२०, तर विनाअनुदानित तुकडीतील प्रवेश क्षमता १०६० ...

गडहिंग्लजला यंदाही केंद्रीय प्रवेश प्रक्रिया
गडहिंग्लज शहरात एकूण आठ कनिष्ठ महाविद्यालये आहेत. त्यांतील अनुदानित तुकडीतील प्रवेश क्षमता ५२०, तर विनाअनुदानित तुकडीतील प्रवेश क्षमता १०६० मिळून १५८० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे.
प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक असे :
- २५ ते ३० ऑगस्ट : ऑनलाईन अर्ज भरणे.
- ३१ ऑगस्ट ते २ सप्टेंबर : अर्जांची छाननी.
- ३ ते ६ सप्टेंबर : निवड यादी तयार करणे.
- ७ सप्टेंबर : निवड यादी प्रसिद्ध करणे.
- ७ ते ८ सप्टेंबर : तक्रारींचे निराकरण (स्थळ : जागृती प्रशाला)
- ९ ते १५ सप्टेंबर : प्रवेश निश्चित करणे.
कोल्हापूर शहरानंतर केंद्रीय प्रवेश प्रक्रिया राबविणारे गडहिंग्लज हे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पहिले व एकमेव शहर आहे. गेल्या चार वर्षांपासून ही प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे.