शिरोळमध्ये काँग्रेसकडून केंद्राचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:29 IST2021-06-09T04:29:52+5:302021-06-09T04:29:52+5:30
शिरोळ : पेट्रोल, डिझेल व गॅसच्या दरवाढीविरोधात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, पालकमंत्री सतेज पाटील व दत्त कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील ...

शिरोळमध्ये काँग्रेसकडून केंद्राचा निषेध
शिरोळ : पेट्रोल, डिझेल व गॅसच्या दरवाढीविरोधात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, पालकमंत्री सतेज पाटील व दत्त कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिरोळ येथे निदर्शने करण्यात आली. यावेळी केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला.
मोदी सरकार पेट्रोल-डिझेलच्या करामधून सामान्य जनतेची प्रचंड लूट करीत आहे. गॅसच्या दरातही प्रचंड वाढ झाली आहे. पेट्रोलने शंभरी गाठली आहे. त्यामुळे केंद्र सरकारने कर हटवून पेट्रोल-डिझेलचे दर कमी करावेत, अशी मागणी करून यावेळी केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला.
आंदोलनात सर्जेराव शिंदे, अशोकराव कोळेकर, शेखर पाटील, तातोबा पाटील, दरगू गावडे, अमरसिंह निकम, श्रीकांत लंबे, अमोल चौगुले, सदाशिव पोपळकर, अनंत धनवडे, राजू मोगलाडे, योगेश पुजारी, मांतेश जुगळे, शीतल उपाध्ये, महेश परीट यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.
फोटो - ०७०६२०२१-जेएवाय-०१
फोटो ओळ - शिरोळ येथे काँग्रेसच्या वतीने केंद्र सरकारविरोधात निदर्शने करण्यात आली.