ओबीसीची जातनिहाय जनगणना करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:25 IST2021-09-21T04:25:54+5:302021-09-21T04:25:54+5:30
शिरोळ : ओबीसी समाजातील जातनिहाय जनगणना तत्काळ करावी, अशा मागणीचे निवेदन ऑल इंडिया मुस्लीम ओबीसी संघटना तसेच अत्तार संघटनेच्यावतीने ...

ओबीसीची जातनिहाय जनगणना करा
शिरोळ : ओबीसी समाजातील जातनिहाय जनगणना तत्काळ करावी, अशा मागणीचे निवेदन ऑल इंडिया मुस्लीम ओबीसी संघटना तसेच अत्तार संघटनेच्यावतीने शिरोळ तहसील कार्यालयास सोमवारी दिले. शिष्टमंडळाच्यावतीने तहसीलदार डॉ. अपर्णा मोरे यांनी निवेदन स्वीकारले.
केंद्र शासनाच्या सर्व सोयी-सुविधांपासून ओबीसी वंचित राहत आहेत. सध्या ओबीसीसह मागासवर्गीय नागरिक जागरुक झाले असून, आता खपवून घेतले जाणार नाही. २०२१ साली होणारी ओबीसीची जातनिहाय जनगणना झालीच पाहिजे, असेही निवेदनात म्हटले आहे. शिष्टमंडळामध्ये एम. एस. गवंडी, बशीर फकीर, फिरोज अत्तार, अतिक समडोळे, ए. जी. मुल्ला, सहिद गवंडी, फिरोज मुजावर आदी उपस्थित होते.
फोटो - २००९२०२१-जेएवाय-०७
फोटो ओळ - शिरोळ येथे ओबीसी संघटनेच्यावतीने तहसीलदार डॉ. अपर्णा मोरे यांना निवेदन देण्यात आले.