शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

भारताचा विजयानंतर शिवाजी चौकात जल्लोष; ध्वनी यंत्रणा आणणाऱ्या रिक्षा चालकावर कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2025 07:24 IST

दुबई येथील आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात हा सामना झाला. मात्र, सामना संपण्यापूर्वीच चाहते एकत्रितपणे छत्रपती शिवाजी चौकाच्या दिशेने येऊ लागले

संदीप आडनाईक

कोल्हापूर : आशिया चषक २०२५ क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघाने पाकिस्तानवर विजय मिळवताच कोल्हापुरात छत्रपती शिवाजी महाराज चौकात रविवारी मध्यरात्री जय श्रीराम, वंदे मातरम्, भारत माता की जय अशा घोषणा देत क्रिकेटप्रेमींनी अर्धा तास जल्लोष केला.दरम्यान, सतर्क पोलिसांनीध्वनी यंत्रणा आणणाऱ्या रिक्षा चालकावर कारवाई केली.

दुबई येथील आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात हा सामना झाला. मात्र, सामना संपण्यापूर्वीच चाहते एकत्रितपणे छत्रपती शिवाजी चौकाच्या दिशेने येऊ लागले. घोषणाबाजी, टाळ्या-शिट्ट्या, पिपाण्यांसह विविध प्रकारची वाद्ये घेऊन दुचाकी-चारचाकी वाहनांतून लहान मुले, तरुण व महिला-मुलींनी जल्लोषात सहभागी झाले. दुचाकीचे सायलेन्सर काढून अनेकजण चौकात जमले. हातात तिरंगा आणि भगवा झेंडा घेतलेल्या तरुणांनी नाचत आणि घाेषणा देत एकच गर्दी केली. लहान मुले आणि महिलांही मागे नव्हते. उंच ठिकाणी जाऊन जल्लोषाची छायाचित्रे व व्हिडीओ घेण्यात आले. मोबाईल कॅमेऱ्यावर अनेकांनी छोटे छोटे व्हिडिओ, रिल्स सोशल मिडियावर अपलोड केले. अनेकजण सेल्फी काढत होते.  

क्रिकेटप्रेमींचे विशेष नियोजन...सार्वजनिक व साप्ताहिक सुट्टीचा रविवार आणि भारत-पाकिस्तान सामन्याचा थरार यामुळे क्रिकेटप्रेमींनी विशेष नियोजन केले होते.अनेकांनी एकत्रित बसून सामन्याचा आनंद लुटला. तालीम संस्था, तरुण मंडळांची कार्यालये, पेठांमधील मुख्य चौक, उद्याने, हॉटेल्स-रेस्टॉरंट व लॉन्समध्ये मोठ्या स्क्रीन लावून सामना पाहण्याचे नियोजन केले होते. नवरात्र सुरु होणार असल्यामुळे अनेकांनी रात्रीच्या चमचमीत जेवणाचेही नियोजन केले होते. भारताने सामना जिंकल्याने नियोजनाचा आनंद द्विगुणीत झाला. 

बाराच्या ठोक्याला पोलिसांनी पांगवली गर्दीनवरात्रीच्या अनुषंगाने पोलिसांनी शहरात कोठेही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी धार्मिक स्थळे, रस्त्यावर कडक बंदोबस्त ठेवला होता. छत्रपती शिवाजी चौकाकडे जाणार्‍या रस्त्यांवर शीघ्र कृती दलाचे दोन प्लॅटून बंदोबस्तासाठी तैनात होते. बाराच्या ठोक्याला रात्री चौकात जमलेल्या तरुणांना घरी जाण्याचे आवाहन करत पोलिसांनी येथील गर्दी पांगवली.

रिक्षा चालकावर कारवाई 

दरम्यान, मध्यरात्री काही तरुण छत्रपती शिवाजी चौकामध्ये ध्वनीयंत्रणा आणण्याचा प्रयत्न करत होते. त्यांना सतर्क पोलिसांनी अडवले. रिक्षामध्ये गाणी लावून ते सारेजण छत्रपती शिवाजी महाराज चौकात आले, तेव्हा पोलिसांनी रिक्षा अडवली आणि चालकावर कारवाई केली. यावेळी जमलेल्या जमावाला पोलिसांनी पांगवले.

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तान