नेसरी येथे उमाजी नाईक यांची जयंती साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:31 IST2021-09-08T04:31:25+5:302021-09-08T04:31:25+5:30
यावेळी आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षक लक्ष्मीकांत नाईक व अप्पाजी नाईक तर रामकृष्ण गुरव यांची गडहिंग्लज तालुका शिक्षकेतर कर्मचारी ...

नेसरी येथे उमाजी नाईक यांची जयंती साजरी
यावेळी आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षक लक्ष्मीकांत नाईक व अप्पाजी नाईक तर रामकृष्ण गुरव यांची गडहिंग्लज तालुका शिक्षकेतर कर्मचारी संघटना सदस्यपदी, व ईश्वर नाईक यांची कोषाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल जोतिबा भिकले, सरपंच आशिष साखरे, सदस्य रणजित पाटील यांचा सत्कार झाला. मंचचे अध्यक्ष अशोक पांडव, प्रशांत नाईक, अप्पाजी नाईक, लक्ष्मीकांत नाईक यांनी मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमास तुकाराम नावलगी, शंकर नाईक, कार्तिक कोलेकर, विलास हल्याळी, श्रावण कांबळे, विजय कांबळे, रवींद्र भोसले, आनंदा कांबळे, संजय जामूने, लक्ष्मण नाईक, जानबा नाईक, बिद्रेवाडीचे उपसरपंच राजेंद्र नाईक, आनंदा कदम, श्रावण पांडव, शिवाजी देसाई, सचिन नाईक, विनायक नाईक, खंडू नाईक, राहुल नाईक, अमित नाईक, सुभाना नाईक, मधुकर नाईक आदी उपस्थित होते.