पगारवाढीचा बिद्री साखर कारखान्यावर आनंदोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:27 IST2021-09-12T04:27:51+5:302021-09-12T04:27:51+5:30

सरवडे : राज्यातील साखर कामगारांना १२ टक्के पगार वाढ झाल्याबद्दल बिद्री साखर कारखान्यावर शाहू साखर कामगार संघाच्या वतीने साखर ...

Celebration of salary hike at Bidri Sugar Factory | पगारवाढीचा बिद्री साखर कारखान्यावर आनंदोत्सव

पगारवाढीचा बिद्री साखर कारखान्यावर आनंदोत्सव

सरवडे : राज्यातील साखर कामगारांना १२ टक्के पगार वाढ झाल्याबद्दल बिद्री साखर कारखान्यावर शाहू साखर कामगार संघाच्या वतीने साखर पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. यावेळी कामगारांनी फटाक्यांची आतषबाजी करुन माजी कृषीमंत्री शरद पवार व बिद्री साखर कारखान्याचे अध्यक्ष के. पी. पाटील यांचे फलक उभारुन त्यावर पुष्पवृष्टी केली.

यावेळी कामगार नेते आर. वाय. पाटील म्हणाले, पगारवाढीचा निर्णय समितीतील नेते शरद पवार, कामगार संघटनेचे नेते तात्यासाहेब काळे, बिद्रीचे अध्यक्ष के. पी. पाटील व संघटनेचे पदाधिकारी यांच्या सकारात्मक भूमिकेतून झाला आहे. समितीने हा निर्णय घेतला असला तरी कारखान्याने त्याची अंमलबजावणी तत्काळ करावी.

यावेळी शाहू कामगार संघटनेचे अध्यक्ष संजय मोरबाळे यांचा सत्कार दिनकर पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी कामगार संचालक भीमराव किल्लेदार, शिवाजीराव केसरकर यांची भाषणे झाली. यावेळी कार्यकारी संचालक के. एस. चौगले, सेक्रेटरी एस. जी. किल्लेदार, चिफ अकाउंटंट एस. ए. कुलकर्णी, लेबर ऑफिसर शिवराज मोरे, कामगार संघटनेचे उपाध्यक्ष व्ही. डी. व्हरकट, मधुकर वागरे, साताप्पा बोडके, दत्ता आबिटकर, बाळासो फराकटे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

शांताराम पाटील यांनी स्वागत केले. तर अजित आबिटकर यांनी आभार मानले.

११ बिद्री कामगार

फोटो

: बिद्री साखर कारखान्यावर साखर कामगार पगार वाढीच्या निर्णयामुळे कामगारांनी आनंदोत्सव साजरा करुन शरद पवार व के. पी. पाटील यांच्या आभार फलकावर पुष्पवृष्टी करण्यात आली.

Web Title: Celebration of salary hike at Bidri Sugar Factory