शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

येत्या शनिवारपासून सुट्ट्यांची पर्वणी; पर्यटनस्थळे गजबजणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2023 16:33 IST

पावसाळी पर्यटनाचे नियोजन

कोल्हापूर : राज्याच्या काही भागात झालेला दमदार पाऊस अन् त्यातच सलग चार दिवस जोडून सुट्ट्या येत असल्याने विविध पावसाळी व धार्मिक पर्यटनस्थळांना भेटी देण्याचे बेत अनेकांकडून आखले जात आहेत.दुसरा शनिवार आणि रविवार सुट्टी, सोमवारी रजा टाकल्यावर मंगळवारची स्वातंत्र्य दिनाची आणि बुधवारी पारसी नववर्षाची सुट्टीही जोडून येत असल्याने अनेकजण सहकुटुंब भटकंतीवर निघणार आहेत. परिणामी कोल्हापूर परिसरासह आसपासची धार्मिक व पर्यटनस्थळे या काळात गजबजणार असल्याची चिन्हे आहेत. बँक आणि शासकीय कर्मचाऱ्यांसाठी हे पाच दिवस ‘लयभारी’ अर्थात आनंदाचे जाणार आहेत. यामुळे या कर्मचाऱ्यांचा आनंद द्विगुणित झाला आहे.स्वातंत्र्य दिन आणि पारसी नववर्षाच्या सुट्ट्यांना जोडून आलेल्या शनिवार, रविवारच्या साप्ताहिक सुट्टीमुळे सरकारी कर्मचाऱ्यांना १२ ऑगस्टपासून चार दिवस सुट्ट्यांची पर्वणी मिळाली आहे. सलग सुट्ट्या आल्या की, कोल्हापूरला येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत वाढ होते. त्यामुळे कोल्हापूर शहरातील पर्यटन शनिवारपासून वाढणार आहे. देवदर्शन, निसर्गरम्य ठिकाणे आणि ऐतिहासिक स्थळांवर फिरण्याची पर्वणी मिळत असल्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात पर्यटक हॉटेल बुक करू लागले आहेत.पावसाळी पर्यटनाचे नियोजनमनसोक्त भिजण्याचा आनंद लुटण्यासाठी तरुणाईसह निसर्गप्रेमी मंडळींनी अशा पावसाळी पर्यटन सहलींचे नियोजन केल्याचे चित्र आहे. रेल्वेने प्रवास करणाऱ्यांनी तर आधीच रिझर्वेेशनदेखील केलेले आहे. त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणांना भेटी दिल्यानंतर ही मंडळी आता थेट गुरुवारी सकाळीच कामावर परतणार आहेत.

या ठिकाणांना पसंतीसलग सुट्ट्यांमुळे पर्यटक, भाविक तसेच उत्साही ट्रेकर्सकडूनही पावसाळी पर्यटन आणि देवदर्शनासाठी आगामी तीन-चार दिवस पावसाचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या सह्याद्रीतील राधानगरी, कोकणातील आंबोलीतील कावळेसाद येथील धबधबे, गणपतीपुळे, मालवणचे समुद्रकिनारे, गोव्यासह स्थानिक पन्हाळा, राधानगरी, जोतिबा, नृसिंहवाडी, अंबाबाई मंदिर, कणेरीमठ, न्यू पॅलेस यासारख्या ठिकाणांना पसंती अधिक आहे. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरtourismपर्यटन