शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

जाळ अन् धूर, मोठ्या एलईडी स्क्रीन; मेस्सीचा अर्जेंटिना विजयी, कोल्हापुरात जल्लोष 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2022 17:25 IST

एम्बापे आणि संघातील कॉम्बिनेशनची चर्चा

कोल्हापूर: कतारमध्ये सुरु असलेला फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत अर्जेंटिना विरुद्ध फ्रान्स यांच्यातील अतिम लढतीची थरार रविवारी रात्री कोल्हापुरातील फुटबॉलप्रेमीनी मोठमोठया एलईडी स्क्रीनवर अनुभवला. मेस्सीच्या अर्जेंटिना संघाने विजेतेपद पटकाविल्यानंतर कोल्हापुरातील चाहत्यांनी फटाक्याची आतषबाजी करीत आनंद लुटला.गेली २८ दिवस जगभरातील फुटबॉल चाहत्यांसह कोल्हापुरातील फुटबॉलप्रेमींनीही याचा आनंद लुटला. अर्जेंटिना विश्वविजेता ठरेल असा अंदाज कोल्हापूरकरांनी बांधला होता. त्यामुळे रविवारी सकाळपासूनच अंतिम सामन्यातील लढतीची उत्सुकता कोल्हापूरकरांमध्ये लागून राहिली होती. अखेरीस सामना सुरू झाला आणि मेस्सीला ढकलल्यामुळे मिळालेल्या पेनल्टी स्ट्रोकवर मेस्सीने अचूक गोल नोंदवला. यानंतर डी मारिओ गोल केला उत्तरार्धात फ्रान्सच्या एम्बापेने ८० आणि ८१ व्या मिनिटात गोल केल्यानंतर सामना २-२ असा उत्कंठावर्धक स्थितीत आला. जादा वेळेत मेस्सीने गोल नोंदवला. त्यानंतर फ्रान्सच्या एम्बापेने तिसरा गोल करीत सामना ३-३ असा क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवणाऱ्या स्थितीत आला आणि पेनल्टी स्ट्रोकवर सामना जिंकताच चाहत्यांनी फटाक्यांची आतषबाजी करीत पारंपरिक वाद्ये आणि डीजेच्या गजरात जल्लोष केला. रात्री उशिरापर्यंत जल्लोष सुरु होता.

मेस्सी'साठी देव पाण्यातकोल्हापुरात ब्राझीलसोबत अर्जेंटिना संघावर अफाट प्रेम करणारी मंडळी होती. अर्जेंटिनानेच फिफा विश्वचषक जिंकावा म्हणून देव पाण्यात ठेवून होते. अनेकांनी देवाकडे मेस्सीचा संघ जिंकू दे यासाठी प्रार्थना केली. ज्याच्या त्याच्या तोडी मेस्सीच होता.

शहरातील प्रमुख चौकात मोठ्या एलईडी स्क्रीनशिवाजी पेठेतील उभा मारुती चौक, निवृती चौक, जुना बुधवार पेठ, खरी कॉर्नर, महाद्वार रोड, खासबाग चौक, मंगळवार पेठ, जावळाचा गणपती, काळा टॉवर, एस.पी. बॉईज चौक, शनिवार पेठ, दिलबहार तालीम मंडळ, टॅबेरोड, फुलेवाडी दत्तमंदिरजवळ, कसबा बावडा पॅव्हेलियन मैदानाजवळ बिग स्क्रीन लावण्यात आल्या होत्या.

एम्बापे आणि संघातील कॉम्बिनेशनची चर्चाफ्रान्सचा संघ सलग दुसऱ्यांदा जिंकण्यासाठी त्याचा सुपरस्टार किलीयन एम्बापे व त्यांच्या सहकाऱ्यांनी अंतिम सामन्यासाठी अवलंबलेली पद्धतीचा अवलंब स्थानिक संघानीही करावा असे चर्चा कोल्हापूरच्या टबॉलप्रेमींमध्ये सामना संपल्यानंतर होती.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरFifa Football World Cupफिफा फुटबॉल वर्ल्ड कप २०२२