शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकांच्या हातात जादाचे २ लाख कोटी उरणार; जीएसटी कपातीवर अर्थमंत्र्यांचा अंदाज
2
देशभरात तपासणी अन् औषधे मोफत; पीएम मोदींच्या हस्ते ‘स्वस्थ नारी योजने’चा शुभारंभ
3
"महाराष्ट्र पेटवण्याचा डाव..."; मीनाताई ठाकरे पुतळ्याची पाहणी, उद्धव ठाकरेंनी व्यक्त केल्या २ शंका
4
'मोदीजी, संपूर्ण रात्र झोपले नाही, त्यांचा कंठ दाटून आला होता'; शिवराज सिंह चौहानांनी सांगितला १९९२-९२ मधील किस्सा
5
"प्रत्येक दुकानावर बोर्ड असायला हवा, 'गर्व से कहो...!'"; वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींचं मोठं आवाहन
6
"शरद पवार हे महाराष्ट्रातील कट कारस्थानाचा कारखाना, त्यांच्यावर..."; गोपीचंद पडळकरांची बोचरी टीका
7
७० वर्षांच्या आजारी आजीला पाठीवरुन घेऊन जाणारा नातू सोशल मीडियावर बनला हिरो
8
गोव्याच्या मनोहर पर्रीकरांचे नाव येताच रोखठोक अजितदादा निरुत्तर का झाले असावे? चर्चांना उधाण
9
पितृपक्ष २०२५: केवळ ५ मिनिटे गुरुपुष्यामृत योग, या दिवशी नेमके काय करावे? पाहा, सविस्तर
10
पीएम मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ तात्काळ हटवा; पाटणा उच्च न्यायालयाचा आदेश
11
दिल्ली-मुंबई हल्ल्यात मसूद अजहरचा हात; जैश कमांडर इलियासचा आणखी एक कबुलीजबाब
12
Ind Vs. Pak Asia Cup: आशिया कपमधून बाहेर गेल्यास पाकिस्तानचं कंबरडं मोडणार, होणार 'इतक्या' कोटींचं नुकसान
13
साखर कारखान्याच्या टँकरमध्ये सापडले दोन तरुणांचे मृतदेह, गार्ड आणि अधिकारी गायब  
14
अकोला हादरले! शासकीय रुग्णालयातच एकाची दगडाने ठेचून हत्या, शाब्दिक वादातून मित्रानेच घेतला जीव
15
NEET च्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या आरोपीचा पोलिसांकडून एन्काऊंटर
16
मंत्र्यांच्या बंगल्यांच्या दुरुस्तीसाठी कोटींची उधळपट्टी? कंत्राटदाराने २१ टक्के 'बिलो'ने काम घेतल्याने प्रकार उघडकीस
17
इनरवेअर बनवणाऱ्या शेअरचा जलवा! १०० स्टॉक्समधून एकाच महिन्यात २ लाख रुपयांची कमाई
18
राज्यात ३९४ ठिकाणी 'नमो उद्यान' विकसित करणार; नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी एकनाथ शिंदे यांची घोषणा
19
"आमचे प्रेरणास्रोत..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींना इटलीच्या जॉर्जिया मेलोनी यांच्याकडून खास शुभेच्छा
20
अशक्यही होईल शक्य फक्त जिद्द हवी; १५ वर्षीय दृष्टीहीन करुणाने मिळवलं भारतीय संघात स्थान

भाजप कार्यकर्त्यांचा कोल्हापूरात जल्लोष, गुजरात, हिमाचल प्रदेशमधील दणदणीत विजयाने आनंदोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 17:01 IST

गुजरात व हिमाचलप्रदेश येथील विधानसभा निवडणूकीत मिळवलेल्या विजयाबद्दल कोल्हापूर शहरातील भाजप कार्यकर्त्यांनी सोमवारी आनंदोत्सव साजरा केला. शिवाजी चौकात फटाक्याची आतिषबाजी करत जिलेबी वाटून कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.

ठळक मुद्देकार्यकर्त्यांनी साजरा केला ढोल ताशावर ठेका धरून आनंदोत्सव शिवाजी चौकात फटाक्याची आतिषबाजी जिलेबी वाटून कार्यकर्त्यांनी केला जल्लोष

कोल्हापूर : गुजरात व हिमाचलप्रदेश येथील विधानसभा निवडणूकीत मिळवलेल्या विजयाबद्दल कोल्हापूर शहरातील भाजप कार्यकर्त्यांनी सोमवारी आनंदोत्सव साजरा केला. शिवाजी चौकात फटाक्याची आतिषबाजी करत जिलेबी वाटून कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.संपुर्ण देशाचे लक्ष लागलेल्या व पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप पक्षाध्यक्ष अमित शहा यांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या गुजरात विधानसभेचा सोमवारी सकाळी निकाल जाहीर झाला. यामध्ये भाजपने सलग सहाव्यांदा सत्ता कायम राखत हिमाचल प्रदेश हे राज्य कॉँग्रेस कडून हिसकावून घेतल्याने भाजप नेत्यांसह कार्यकर्त्यांच्या आनंदाला पारावर राहिला नाही.

कोल्हापूर महानगर भाजप कार्यकर्त्यांनी पक्ष कार्यालयापासून ढोल ताशाच्या गजरात येऊन शिवाजी चौकात जल्लोष केला. नागरिकांना जिलेबीचे वाटप करून फटाक्याची आतिषबाजी केली. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष संदीप देसाई यांच्यासह कार्यकर्त्यांनी ढोल ताशावर ठेका धरून आनंदोत्सव साजरा केला.

यावेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकासाला महत्व देऊन वाटचाल सुरू ठेवल्याने विरोधकांनी कितीही कांगावा केला तर देशातील सामान्य माणूस कोणाबरोबर आहे, हे अधोरिखित झाले आहे.

गुजरात निवडणूकीत विरोधकांनी भाजप व आमच्या नेत्यांबद्दल अपप्रचार केला पण जनता जागरूक आहे, विकासाच्या मागे उभी राहिल्याने मोठा विजयी संपादन झाला. यावेळी भाजपचे महापालिकेतील गटनेते विजय सुर्यवंशी, सुरेश जरग, अमोल पालोजी, आर. डी. पाटील आदी उपस्थित होते.

 

 

टॅग्स :BJPभाजपाkolhapurकोल्हापूरGujarat Election 2017गुजरात निवडणूक 2017