महापालिकेच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:09 IST2021-02-20T05:09:00+5:302021-02-20T05:09:00+5:30
कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त महापालिकेच्यावतीने राजर्षि छत्रपती शाहू सभागृहातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला प्रशासक डॉ. ...

महापालिकेच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी
कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त महापालिकेच्यावतीने राजर्षि छत्रपती शाहू सभागृहातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी उपआयुक्त निखिल मोरे यांनी शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्रावरील श्लोकांचे वाचन केले.
कार्यक्रमाला उपआयुक्त रविकांत आडसुळे, शिल्पा दरेकर, सहायक आयुक्त संदीप घार्गे, शहर अभियंता नेत्रदीपक सरनोबत, मुख्य लेखापाल संजय सरनाईक, आरोग्य अधिकारी डॉ. अशोक पोळ, उपशहर अभियंता रावसाहेब चव्हाण, जनसंपर्क अधिकारी मोहन सूर्यवंशी, संजय भोसले व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त महापालिकेच्यावतीने शिवाजी चौक, निवृत्ती चौक व महापालिकेच्या राजर्षि छत्रपती शाहू सभागृहातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यांसभोवती विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
फोटो क्रमांक - १९०२२०२१-कोल-केएमसी
ओळ - शुक्रवारी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त कोल्हापूर महानगरपालिकेच्यावतीने प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.