शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

वर्गणीची सक्ती न करता कोल्हापूरात शिवजयंती उत्सव

By admin | Updated: April 3, 2017 13:42 IST

संयुक्त उत्तरेश्वर पेठेतील मंडळांचा निर्णय : पन्नास हून अधिक संस्थांचा सहभाग

आॅनलाईन लोकमतकोल्हापूर : वर्गणीची सक्ती न करता सभासद वर्गणीतून डॉल्बीमुक्त, पारंपारीक शिवचरित्राला अभिप्रेत शिवजयंती उत्सव साजरा करण्याचा निर्णय संयुक्त उत्तरेश्वर पेठेने केला आहे. उत्तरेश्वर पेठेतील ५० हून अधिक तरुण मंडळे, तालीम संस्था, महिला मंडळे, बचत गट यांची बैठक श्री उत्तरेश्वर शिवभक्त कला क्रीडा, सांस्कृतिक मंडळाच्यावतीने श्री उत्तरेश्वर महादेव मंदिरात पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी वाघाच्या तालमीचे अध्यक्ष विनायक साळोखे हे होते.

उत्सव कमीटीचे मावळते अध्यक्ष योगेश पाटील यांनी प्रास्ताविकात गतवर्षीच्या उत्सवाचा आढवा घेतला. सुरेश कदम यांनी मागील वर्षाचा ताळेबंद सादर केला. मंडळाचे मार्गदर्शक किशोर घाटगे यांनी २८ एप्रिल रोजी होणारा संयुक्त उत्तरेश्वर पेठेचा शिवजयंती उत्सव हा डॉल्बीमुक्त, पारंपारिक पध्दतीने विवीध प्रबोधनात्मक पध्दतीने साजरा व्हावा. यामध्ये पेठेतील अबालवृध्दांचा सहभाग असावा असे मत व्यक्त केले.

वर्गणीची सक्ती न करता सभासद वर्गणीतून उत्सव साजरा करण्यात यावा अशी सुचना आण्णा पसारे यांनी केली. दिपक घोडके यांनी महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात असावा त्यासाठी महिलांची समिती गठीत करावी अशी सुचना मांडली. किरण पोवार यांनी तज्ञांची व्याख्याने व्हावीत असे सुचवले.

गड किल्यांची स्वच्छता मोहीमेने उत्सवाला प्रारंभ करावा असे अनिकेत भोसले यांनी सुचवले. यावेळी मिरवणूक समिती, सजावट समिती, प्रसिध्द समिती, स्पर्धा समिती, व्याख्यान समिती, गडकिल्यांची स्वच्छता समिती यासह विवीध समित्या करण्याचे नियोजन करण्यात आले. पारंपारिक पध्दतीने घोडे, उंट, शिवप्रतिमेसह, ढोलताशे पथके, झांज पथक, धनगरी ढोल, मुलींचे लेझीम पथक, मर्दानी खेळ, हालगी पथक, वारकरी भजनी मंडळ, या वाद्यांसह प्रबोधनात्मक फलकासह भव्य मिरवणूक सोहळा साजरा करण्याचे ठरविण्यात आले.

यावेळी स्वप्नील सावंत, जयदिप भोसले, कुमार अतिग्रे, सनी अतिग्रे, किशोर माने, जलराज कदम, अक्षय जाधव, अवधूत सुर्वे, सुनिल माने, प्रदीप सुतार, सुधीर साळोखे यांनी विवीध सुचना व कल्पना मांडल्या. यावेळी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते. संदीप सुतार यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)