इस्लामपूर : इस्लामपूर शहर व परिसरात आज युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली. इतिहासकालीन पोवाड्यांनी अवघे शहर दुमदुमून गेले होते. शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागातील शिवप्रेमी युवकांनी शिवनेरीवर प्रज्ज्वलित केलेल्या शिवज्योतींचेही आज सकाळपासून ‘जय भवानी जय शिवाजी, हर हर महादेव, छत्रपती शिवाजी महाराज की जय’ अशा जयघोषात आगमन होत होते. येथील तहसील कचेरीजवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ या शिवज्योतींचे स्वागत करण्यात आले.यल्लम्मा चौकात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नगरसेवक आनंदराव पवार, शहरप्रमुख शकील सय्यद यांच्या प्रमुख उपस्थितीत ज्येष्ठ नागरिक जयवंत खंडागळे, धोंडीराम पुजारी यांच्याहस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.यावेळी उपस्थित शिवसैनिकांनी शिवगर्जनेच्या घोषणांनी परिसर दुमदुमून टाकला. उरुण परिसरातील शिवाजी चौक, तानाजी चौक, उदय चौक, पाटील गल्ली, जाधव गल्लीसह महावीर चौक, शिराळा नाका, अहिल्यानगर, शिवनगर या परिसरात शिवप्रतिमांची प्रतिष्ठापना करुन पूजन करण्यात आले. सर्वच ठिकाणी इतिहासकालीन पोवाड्यांच्या ध्वनिफिती वाजत होत्या.मुंबई परिवहन सेवेचे अध्यक्ष अरुणभाई दुधवडकर, आमदार राजेश क्षीरसागर, आमदार अनिल बाबर, आमदार सत्यजित पाटील, आमदार उल्हास पाटील, शिवसेनेचे उपनेते व सातारा/सांगलीचे संपर्कप्रमुख प्रा. नितीन बानुगडे-पाटील या मान्यवरांच्या उपस्थितीत मिरवणुकीस सुरुवात होईल.शिवजयंती उत्सवाचे संयोजन आनंदराव पवार यांच्यासह शहरप्रमुख शकील सय्यद, उमेश पवार, सागर मलगुंडे, राहुल टिबे, रणजित शिंदे, सुनील गायकवाड, महेश गुरव, संजय गायकवाड, नारायण पाटील, प्रदीप लोहार, संदीप सपकाळ, वैभव माळी, दिलीप कुचीवाले, विलास नाईक, विनोद शेवाळे करीत आहेत. (वार्ताहर)शिवपुतळ्याचे गोटखिंडीत पूजनगोटखिंडी : गोटखिंडी (ता. वाळवा) येथे शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. ग्रामपंचायत कार्यालयात उपसरपंच विजय पाटील व माजी उपसरपंच धैर्यशील थोरात यांच्या उपस्थितीत शिवाजी महाराज यांच्या अर्धपुतळ्याचे पूजन करण्यात आले. न्यू शिवाजी क्रीडा मंडळाच्यावतीने विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात कृष्णात पाटील यांच्याहस्ते पूजन करण्यात आले. यावेळी माजी उपसरपंच प्रकाश पाटील, बाजीराव पाटील, रामचंद्र पाटील, संपत पाटील, जगदीश पाटील, भानुदास पाटील, रमेश चिकलकर यांच्यासह मंडळाचे कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)
जिल्ह्यात विविध उपक्रमांनी शिवजयंती साजरी
By admin | Updated: April 21, 2015 00:32 IST