तिळवणीत जागतिक दिव्यांग दिन साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:53 IST2020-12-05T04:53:52+5:302020-12-05T04:53:52+5:30
इचलकरंजी : तिळवणी (ता. हातकणंगले) येथील डेफ स्कूलमध्ये जागतिक दिव्यांग दिन साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी रोटरी क्लबचे अध्यक्ष अभय ...

तिळवणीत जागतिक दिव्यांग दिन साजरा
इचलकरंजी : तिळवणी (ता. हातकणंगले) येथील डेफ स्कूलमध्ये जागतिक दिव्यांग दिन साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी रोटरी क्लबचे अध्यक्ष अभय यळरूटे होते. यावेळी डी. एम. कस्तुरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
मान्यवरांनी हेलन केलर यांच्या प्रतिमेचे पूजन केले. कलाशिक्षक संजय काशीद यांनी दिव्यांग विद्यार्थ्यांना मास्क व पुष्पगुच्छ दिले. यावेळी दीपक निंगुडगेकर, आनंदा रणदिवे, प्रांजली माने, विश्वराध्य होनमुर्गीकर, आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन अमृता पाटील यांनी केले. सुहास गायकवाड यांनी आभार मानले.
(फोटो ओळी)
०३१२२०२०-आयसीएच-०४
तिळवणी (ता.हातकणंगले) येथील रोटरी डेफ स्कूलमध्ये मान्यवरांनी हेलन केलर यांच्या प्रतिमेचे पूजन केले.