स्त्रीशक्तीच्या सन्मानाने महिला दिन साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:26 IST2021-03-09T04:26:44+5:302021-03-09T04:26:44+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोरोना काळात धिटाईने त्याचा सामना करत सर्वसामान्यांसाठी झटलेल्या महिला, डॉक्टर, नर्स, सफाई कामगार, औद्योगिक ...

स्त्रीशक्तीच्या सन्मानाने महिला दिन साजरा
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोरोना काळात धिटाईने त्याचा सामना करत सर्वसामान्यांसाठी झटलेल्या महिला, डॉक्टर, नर्स, सफाई कामगार, औद्योगिक न्यायालयात काम करणाऱ्या यासह विविध क्षेत्रात कार्यकर्तृत्व सिद्ध केलेल्या स्त्रियांचा सन्मान करत सोमवारी शहरात महिला दिन साजरा झाला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संस्था, संघटना, पक्ष, शाळा, महाविद्यालयांमध्ये छोटेखानी समारंभाद्वारे स्त्री शक्तीचा जागर झाला. या निमित्ताने स्त्रियांबद्दलच्या सन्मानाच्या भावना समाजमनांत अधिक दृढ झाली.
जिजाऊ ब्रिगेडतर्फे प्रशासकांचा सत्कार
येथील जिजाऊ ब्रिगेडतर्फे महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांचा सत्कार करण्यात आला. यासह डॉ. शिल्पा वसगावकर व महिला पत्रकारांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सुनंदा चव्हाण, रंजना पाटील, मीना नलवडे, सीमा सरनोबत, कल्याणी माने, सुप्रिया चाळके, मानसी धुमाळ उपस्थित होत्या.
शाश्वत प्रतिष्ठानतर्फे दीपा शिपूरकर यांचा सत्कार
येथील शाश्वत प्रतिष्ठानच्या वतीने सामाजिक कार्यकर्त्या दीपा शिपूरकर यांचा सत्कार अध्यक्ष डाॅ. गुरुदत्त म्हाडगुत आणि उपाध्यक्ष राहुल चौधरी यांच्या हस्ते ग्रंथ आणि फुलझाडाचे रोप देऊन करण्यात आला. अध्यक्षस्थानी रेशन व्यापारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे होते. एड्स नियंत्रण कार्यक्रमाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी, अमन फाउंडेशन ऑटीझम विषयावर काम करणाऱ्या शिपूरकर या प्राणीमित्र, वृक्षसंवर्धन, कोल्हापूर थुंकी मुक्त अभियान यासह सामाजिक, वंचितांना न्याय मिळवून देण्यासाठी झटत आहेत. यावेळी राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे करवीर तालुकाध्यक्ष तुकाराम जांभळे, नीलेश कांबळे, संचालक संतोष परब, चित्रपट निर्माते संदीप जाधव, पल्लवी देशपांडे, शिल्पा अष्टेकर, मनीषा माने यांच्यासह सदस्य उपस्थित होते.
--
औद्योगिक न्यायालयातील महिलांचा सन्मान
येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारत येथील औद्योगिक न्यायालयातील सुनीता बुवा, चैत्राली कोरवी, मनस्वी लिंगडे, तेजस्विनी शिंदे, शोभा कडू, उज्ज्वला भारती, विनीता नागराळे या महिला कर्मचाऱ्यांचा जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांच्या हस्ते रोप आणि भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी औद्योगिक न्यायालयाच्या न्यायाधीश समिना ए. खान, कामगार न्यायालयाच्या न्यायाधीश अर्चना जी. बेहरे उपस्थित होत्या.
न्यायाधीश खान म्हणाल्या, पुरुष आणि स्त्री असा भेदभाव न करता एकसमान पाहायला हवे. स्त्री ही पुरुषाच्या एक पाऊल पुढे आहे. ती सर्वच क्षेत्रात आघाडीवर आहे. घरची जबाबदारी सांभाळून नोकरी सक्षमपणे करत आहे. न्यायाधीश बेहरे यांनीही मनोगत व्यक्त केले. ॲड. प्रतिभा भोसले-निंबाळकर यांनी सूत्रसंचालन केले.
एनर्जी ड्रिंकचे वाटप
कै.जयसिंगराव निंबाळकर बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने ताराराणी विद्यापीठाच्या उषाराजे हायस्कूलमधील विद्यार्थिनी व शिक्षकांना हजार पॅकेट्स ग्लुकोप्लस एनर्जी ड्रिंक्सचे वाटप करण्यात आले. यावेळी संस्थेच्या उपाध्यक्षा प्रियांका निंबाळकर व ॲड. शुभांगी निंबाळकर उपस्थित होत्या.
कार्यक्रमास मुख्याध्यापिका अंजली साठे, उपमुख्याध्यापिका शोभा चौधरी, पर्यवेक्षिका वैशाली जमेनिस, पर्यवेक्षक संजय मिठारी उपस्थित होते. शाहीर विशारद डॉ. आझाद नायकवडी यांनी सूत्रसंचालन केले.
----
फोटो नं ०८०३२०२१-कोल-दिपा शिपूरकर
ओळ : कोल्हापुरातील शाश्वत प्रतिष्ठानच्या वतीने सामाजिक कार्यकर्त्या दीपा शिपूरकर यांचा संस्थेचे अध्यक्ष डाॅ. गुरुदत्त म्हाडगुत आणि उपाध्यक्ष राहुल चौधरी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
--
फोटो नं ०८०३२०२१-कोल-कादंबरी बलकवडे
ओळ : कोल्हापुरातील जिजाऊ ब्रिगेडतर्फे महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांचा सत्कार करण्यात आला.
-
०८०३२०२१-कोल-उषाराजे हायस्कूल
ओळ : कै.जयसिंगराव निंबाळकर बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने ताराराणी विद्यापीठाच्या उषाराजे हायस्कूलमधील विद्यार्थिनी व शिक्षकांना हजार पॅकेट्स ग्लुकोप्लस एनर्जी ड्रिंक्सचे वाटप करण्यात आले.
--