आजऱ्यात प्रजासत्ताक दिन साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:04 IST2021-02-05T07:04:43+5:302021-02-05T07:04:43+5:30

आजरा नगरपंचायतीत नगराध्यक्षा ज्योत्स्ना चराटी, पंचायत समितीसमोर सभापती उदय पवार, ग्रामीण रुग्णालयासमोर वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक फर्नांडिस, पोलीस स्टेशनसमोर ...

Celebrate Republic Day in Ajmer | आजऱ्यात प्रजासत्ताक दिन साजरा

आजऱ्यात प्रजासत्ताक दिन साजरा

आजरा नगरपंचायतीत नगराध्यक्षा ज्योत्स्ना चराटी, पंचायत समितीसमोर सभापती उदय पवार, ग्रामीण रुग्णालयासमोर वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक फर्नांडिस, पोलीस स्टेशनसमोर सहायक पोलीस निरीक्षक बालाजी भांगे यांच्याहस्ते ध्वजारोहण झाले.

तालुक्यातील सर्व जि. प.च्या प्राथमिक शाळा, ग्रामपंचायतींमध्ये ध्वजारोहण करण्यात आले. आजरा महाविद्यालयात विविध विषयांच्या भित्तीपत्रकांचे उद्घाटन, तर आजरा हायस्कूल व व्यंकटराव हायस्कूलमध्ये आदर्श विद्यार्थी, विद्यार्थीनींसह गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. रोझरी हायस्कूलमध्ये फादर मायकल पिटरस् यांच्याहस्ते ध्वजारोहण झाले.

तालुक्यातील २६ ग्रामपंचायतींमध्ये प्रशासकाच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

-------------------------

उत्तूर परिसरात ध्वजारोहण उत्साहात

उत्तूर : उत्तूर येथे सरपंच वैशाली आपटे यांच्याहस्ते ध्वजारोहण झाले. वसंतरावदादा पाटील विद्यालयात बी. एस. तौकरी यांच्याहस्ते, पार्वती शंकर शैक्षणिक संस्थेत विजय सावेकर यांच्याहस्ते, उत्तूर विद्यालयात संस्थाध्यक्ष विजय देसाई यांच्याहस्ते, केंद्र शाळेत मुख्याध्यापक संजय पोवार यांच्याहस्ते ध्वजारोहण झाले.

Web Title: Celebrate Republic Day in Ajmer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.